esakal | उत्पादन शुल्कच्या धडक कारवाईत 5 लाखांची दारू जप्त; 26 गुन्ह्यांत 28 जणांना अटक

बोलून बातमी शोधा

Karad
उत्पादन शुल्कच्या धडक कारवाईत 5 लाखांची दारू जप्त; 26 गुन्ह्यांत 28 जणांना अटक
sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : कोरोनाच्या काळात राज्य उत्पादन शुल्कने कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांत केलेल्या कारवाईत 26 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात 28 जणांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून अवैध विक्रीसाठी आलेली 308 बॅरेल देशी दारू, 104 लिटर ताडीसह पाच लाख 83 हजार 544 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाईत नऊ दुचाकीसह एक रिक्षा जप्त केली आहे, अशी माहिती उत्पादन शुल्कचे निरीक्षक आर. एस. पाटील यांनी दिली. मार्चपासून कारवाई सुरू आहे.

कोविडचा प्रादुर्भावाच्या काळात अवैध व चोरट्या दारूच्या वाहतूक व विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने मोहीम हाती घेतली आहे. विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार यांनी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उत्पादन शुल्कचे अधीक्षक अनिल चासकर यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे येथील विभागीय पथकाने मार्च व एप्रिल महिन्यात मोहीम राबवल्या. त्यात 26 गुन्ह्यांत 28 जणांना अटक झाली आहे. त्यात नऊ दुचाकीसह एक रिक्षाही जप्त आहे. पाच लाख 83 हजार 544 रुपयांची दारू जप्त केली आहे. कारवाईत उत्पादन शुल्कचे निरीक्षक पाटील यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक एस. बी. जंगम, आर. एस. खंडागळे, सहायक दुय्यम निरीक्षक एस. टी. बावकर, व्ही. व्ही. बनसोडे, एस. आर. बक्केवाड, जे. एस. माने व बी. एस. माळी यांनी सहभाग घेतला सहभाग घेतला.

Edited By : Balkrishna Madhale