सांगलीची सुपारी किलर टोळी एलसीबीकडून गजाआड

सचिन शिंदे
Tuesday, 24 November 2020

कऱ्हाडच्या एका ट्रॉन्सपोर्ट व्यावसायिकाची सुपारी सांगलीच्या टोळीला दिल्याची माहिती सातारा एलसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना एलसीबीने त्याची माहिती दिली. त्यानुसार कारवाईचे आदेश झाले.

कऱ्हाड  (जि. सातारा) : कऱ्हाडच्या ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्याच्या खुनाचा 50 हजारांची सुपारी घेवून त्याचा खून करण्यासाठी येथे आलेल्या सांगलीच्या सुपारी किलर चौघांची टोळी सातारच्या एलसीबीने शिताफीने गजाआड केली. येथील महामार्गावरील हॉटेल रॉयल पॅलेससमोर काल रात्री उशिरा कारवाई झाली. त्यात चौघांना त्यांच्या हत्यारासह ताब्यात घेण्यात आले आहे. कोरोबा बापू मेटकरी (वय 23, रा, सिद्धनाथ कॉलनी, कुपवाड रस्ता, सांगली), सलीम आप्पालाल नदाफ (22, विश्रामबाग, कुपवाड रस्ता, सांगली), कुमार सोपान कोळी (24, गजानन कॉलनी, विश्रामबाग, सांगली) व प्रदीप बाळू माळी (24, मंगलमूर्ती कॉलनी, कुपवाड रस्ता, सांगली) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. दोन दुचाकीसह स्ततूर, मोबाईलसह अन्य साहित्य असा एक लाख 64 हजारांचा मुद्देमालही त्यांच्याकडून जप्त केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाडच्या एका ट्रॉन्सपोर्ट व्यवसायिकाची सुपारी सांगलीच्या टोळीला दिल्याची माहिती सातारा एलसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांना एलसीबीने त्याची माहिती दिली. त्यानुसार कारवाईचे आदेश झाले. त्यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे सहायक पोलिस निरीक्षक आंनदार साबळे यांच्या पथकाने कऱ्हाडला येवून कारवाई केली. त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार सुपारी घेतलेले खूनी येथील वारूंजी फाटा परिसरातील हॉटेल रॉयल पॅलेस परिसरात तांबले होते. रात्री नऊच्या सुमारास ते सुपारी वाजविणार होते. त्याच वेळी एलसीबीच्या पथकानेही तेथे सापळा रचला. त्यावेळी तेथे दोन दुचाकीवरूनव चोघेजम संशयितरित्या फिरताना पोलिसांना आढळून आले. मात्र, त्या संबंधितांना पोलिसांची चाहूल लागल्याने ते पळून जावू लागले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना छापा टाकून पकडले. त्यातूनही दोघे फरार जाले. अन्य दोघे जागीच सापडले. त्यांनी कऱ्हाडच्या व्यापाऱ्याची सुपारी घेवून त्याचा खून करण्यासाठी येथे आल्याची माहिती पोलिसांना दिली. 

युवतीस पळवून नेण्यास मदत केल्याप्रकरणी दोन गटांत तुफान राडा; नऊ जणांना अटक

पोलिसांनी त्या दोघांकडे कसून चौकशी केली. त्यावेळी ते सुपारी किलर असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या अन्य दोन साथीदरांना पोलिसांनी पाचवड फाटा परसिरात काही वेळाने अटक केली. त्यांनी त्यांची ओळख सांगताना कोरोबा मेटकरी, सलीम नदाफ, कुमार कोळी, प्रदीप माळी अशी असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. संबंधितांनीही एका ट्रन्सपोर्ट व्यापाऱ्याच्या खूनासाठी 50 हजारांची सुपारी घेतल्याची कबुली पोलिसांजवळ दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्या चोघाही संशयीतांकडून दुचाकीसह स्ततूर, कोयता, लाकडी दांडके, मोबाईल संच असा एक लाख 64 हजार 373 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सहायक पोलिस निरिक्षक साबळे यांच्यासह हवालदार सुधीर बनकर, शरद बेबले, साबिर मुल्ला, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, केतन शिंदे, रोहित निकम, संकेत निकम, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन, महेश पवार, संजय जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested Four Persons From Sangli Satara News