चंदन चोरीप्रकरणी दोघांना अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

प्रवीण जाधव
Wednesday, 21 October 2020

सातारारोड परिसरात काही जण चंदनाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला या परिसरात सापळा लावण्यास सांगितले होते. त्यानुसार या पथकाने सातारारोड येथील बसस्थानक चौकामध्ये संशयितांना अटक केली.

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालय व सैनिक स्कूलच्या आवारातून चंदन चोरणाऱ्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सातारारोड येथे अटक केली आहे. त्यांच्याकडून 45 हजार रुपये किमतीचे चंदनाच्या गाभ्याचे 15 किलो तुकडे जप्त करण्यात आले आहेत. 

जान्या तात्या पवार (वय 25, रा. आगाशिवनगर, कऱ्हाड) व संकेत आनंदा काळे (वय 19, रा. रेवडी, ता. कोरेगाव) अशी त्यांची नावे आहेत. सातारारोड परिसरात काही जण चंदनाच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सर्जेराव पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकाला या परिसरात सापळा लावण्यास सांगितले होते. त्यानुसार या पथकाने सातारारोड येथील बसस्थानक चौकामध्ये संशयितांना अटक केली. 

साताऱ्यात पोलिसांवर प्राणघातक हल्ला; एकाची प्रकृती गंभीर, दोघे ताब्यात

त्यांच्याकडून 45 हजार रुपये किमतीचे चंदनाच्या गाभ्याचे 15 किलोचे तुकडे आढळून आले. चौकशीमध्ये त्यांनी पाच महिन्यापूर्वी सैनिक स्कूल, जिल्हाधिकारी कार्यालय व कोडोली परिसरातून ही चंदनाची झाडे चोरल्याची कबुली दिली. या कारवाईमुळे शहर परिसरातील चंदन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे, उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, सहायक फौजदार जोतीराम बर्गे, हवालदार सुधीर बनकर, आतीश घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, नीलेश काटकर, अतिम सपकाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, तनुजा शेख, विजय सावंत अशी त्यांची नावे आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested Four Persons From Satara Road Satara News