
अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल पालकर करीत आहेत.
वडूज (जि. सातारा) : डांभेवाडी (ता. खटाव) येथील विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मृत विवाहितेचा पती, सासू, सासरे अशा तिघांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. सारिका विशाल बागल (वय 29) असे विवाहितेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डांभेवाडी येथील विवाहिता सारिका बागल हिने शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृत महिलेच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. मृत विवाहितेचे वडील लाला गोविंद शिंदे (रा. भालवडी, ता. माण) यांनी वडूज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, सारिका हिचे पती विशाल बागल, सासू छबुताई बागल, सासरे लालासाहेब बागल (सर्वजण रा. डांभेवाडी) यांनी आपापसांत संगनमत करून सारिका हिला घरातील कामे नीट येत नाहीत, तुला मुले सांभाळणे होत नाहीत, असे म्हणून टोचून बोलून शिवीगाळ करत होते. तिला कष्टाची कामे करण्यास सांगून उपाशीपोटी ठेऊन शिवीगाळ, मारहाण करून, माहेरवरून शेतीसाठी पैसे घेऊन ये, असे म्हणून जाचहाट छळ केला आहे.
पंकजाताईही महाबळेश्वरच्या प्रेमात, ट्विटद्वारे दिली माहिती आणि फोटोही केले शेअर
पती, सासू, सासरे यांच्या त्रासाला कंटाळून सारिका हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी पती विशाल, सासू छबुताई यांना पोलिसांनी अटक केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक शीतल पालकर करीत आहेत.
Edited By : Siddharth Latkar