तीनशे रुपयांची लाच घेताना महेश्वर बडेकर सापडला

तीनशे रुपयांची लाच घेताना महेश्वर बडेकर सापडला

कऱ्हाड (जि. सातारा) : फेरफार उताऱ्याच्या नकला देण्यासाठी मागणी केलेल्या 800 पैकी 300 रुपयांची लाच घेताना येथील तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंध खात्याने छापा टाकून अटक केली. महेश्वर बडेकर (रा. शास्त्रीनगर, मलकापूर) असे संबंधित कर्मचाऱ्याचे नाव आहे.
 
बडेकर अभिलेख कक्षापाल आहे. त्याने 800 रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी 300 रुपयांची लाच स्वीकारताना त्याला मंळवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे पथकाने पकडले. तक्रारदाराला त्याच्या जमिनाच्या कागदांच्या फेरफाराच्या उताऱ्याच्या नकला हव्या होत्या. त्यासाठी अभिलेख कक्षापाल बडेकरने तक्रारदाराकडे 800 रुपये लाचेची मागणी केली होती. बडेकरने तक्रारदाराकडून सोमवारी 500 रुपये स्वीकारले होते. उरलेले 300 रुपये मंगळवारी (ता.23) देण्याचे ठरले होते. त्याची संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. 

त्यानुसार मंगळवारी दुपारी पथकाने बडेकर याच्या कार्यालयात सापळा रचला. त्या वेळी बडेकरला 300 रुपयांची लाच घेताना पकडले. लाचलुचपत प्रतिबंध खात्याचे पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार विनोद राजे, संभाजी काटकर, नीलेश येवले यांनी सापळा रचून कारवाई केली.

Covid- 19 Effect : संभाव्य धोका टाळण्यासाठी पुढील सात दिवस शाळेला दिली सुटी

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com