ओझर्डेत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहाजण अटकेत

विलास साळुंखे
Thursday, 3 December 2020

ओझर्डेतील सोनेश्‍वर-कृष्णा नदीच्या पुलाखालील मोकळ्या जागेत काही व्यक्ती तीनपानी जुगार पैजेवर पैसे लावून खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक उत्तम दबडे यांना कारवाईचा आदेश दिला. त्यानुसार साध्या वेशातील पोलिस पथकाने पंचांसह छापा टाकला.

भुईंज (जि. सातारा) : ओझर्डे (ता. वाई) येथील जुगार अड्ड्यावर साताऱ्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून सुमारे 86 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक वाई परिसरात गस्त घालत असताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत ओझर्डेतील सोनेश्‍वर-कृष्णा नदीच्या पुलाखालील मोकळ्या जागेत काही व्यक्ती तीनपानी जुगार पैजेवर पैसे लावून खेळत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यांनी सहायक पोलिस उपनिरीक्षक उत्तम दबडे यांना कारवाईचा आदेश दिला. त्यानुसार साध्या वेशातील पोलिस पथकाने पंचांसह छापा टाकला. त्यावेळी सहा जण जुगार खेळताना सापडले. त्यापैकी एक जण पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. 

सुडाच्या धगीतून संपविले युवकास; मोर्वेतील तिघांना अटक

त्या ठिकाणी जुगार साधने, रोख रक्कम, मोबाईल व दोन दुचाकी असा मिळून सुमारे 86 हजार 970 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या कारवाईत जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांच्या सूचनेप्रमाणे उत्तम दबडे, हवालदार संतोष सपकाळ, संतोष पवार, रवींद्र वाघमारे, प्रवीण कांबळे, विजय सावंत यांनी भाग घेतला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested Six People In Ozarde Satara News