'कास' ला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; विकासनगरसह शाहूनगरच्या युवकास अटक

प्रवीण जाधव
Wednesday, 16 December 2020

या घटनेची माहिती पीडित मुलीने तिच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे तपास करत आहेत.

सातारा : सातारा शहराजवळच्या उपनगरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी चौघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. कुणाल सुरेश इंगळे (वय 20, रा. इंद्रायणी मेडिकलजवळ, शाहूनगर), अमर अशोक चव्हाण (वय 21, रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा), अनिकेत अनिल पिसाळ (वय 21) व संतोष अशोक पवार (दोघेही रा. विकासनगर, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यातील कुणाल, अमर व अनिकेत यांना अटक करण्यात आली आहे, तर संतोष अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. 

याबाबत पीडित मुलीच्या नात्यातील महिलेने फिर्याद दिली आहे. पीडित मुलीचे संशयितांनी अपहरण केले. कुणालने तिला बुधवारी (ता. 9) गोडोलीतील धनलक्ष्मी लॉजवर नेले. तेथे दुपारी एक ते सायंकाळी पाच या कालावधीत तिच्यावर अत्याचार केले. त्याच दिवशी रात्री अमरने अनिकेतच्या कारमध्ये तिच्यावर अत्याचार केला. अनिकेतने गुरुवारी (ता. 10) सकाळी आठ ते दुपारी दोन या कालावधीत कास पठारावर नेऊन तिच्यावर अत्याचार केला, तर संतोषनेही शुक्रवार (ता. 11) ते कालपर्यंत चार दिवस अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

काबाडकष्टाने पिकवलेल्या पपईला मिळतोय कवडीमोलाचा भाव; सातारा जिल्ह्यातील शेतकरी अक्षरशः रडकुंडीला

या घटनेची माहिती पीडित मुलीने तिच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे तपास करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested Three Youth From Satara Who Troubled Girl Near Kass Satara News