परप्रांतियांना लुटणाऱ्या तिघांना साता-यात अटक

गिरीश चव्हाण
Sunday, 18 October 2020

दोन दिवसांत लुटमारीच्या दोन घटना घडल्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक बाजीराव ढेकळे, उपनिरीक्षक नानासाहेब कदम, अनिल पाटील, हवालदार प्रशांत शेवाळे, अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, जोतिराम पवार, गणेश भोग, अक्षय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, किशोर तारळकर यांनी तपास सुरू केला.

सातारा : येथील गणपतराव तपासे पथावर (राधिका रस्ता) दोघांना मारहाण करत त्यांच्याकडील 20 हजारांचा ऐवज तिघांनी लुटला होता. याप्रकरणी शहर पोलिसानी अक्षय सूर्यकांत पवार (वय 22, रा. मस्करवाडी, ता. सातारा), दीपक भरत चव्हाण (वय 22, रा. लावंघर), दत्तात्रय आबा शिंदे (वय 29, रा. शिंदेवाडी, ता. सातारा) यांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. अटकेतील तिघांनी लूटमार केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून दुचाकीसह एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
कर्मवीर कॉलनीत अजितकुमार विश्‍वनाथ ठाकूर (वय 20) हा युवक राहण्यास असून, ता. 15 च्या सायंकाळी सहाच्या सुमारास राधिका रस्त्यावरून निघाला होता. या वेळी दुचाकीवरून तीन जण त्याठिकाणी आले. त्यांनी ठाकूर व त्यांच्या मित्रास मारहाण करत मोबाईल हिसकावून घेत पळ काढला. याची तक्रार ठाकूर यांनी रात्री शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंदवली. ता. 16 रोजी रात्री राधिका रस्त्यावरच रामानंद शिवनाथ सहा (वय 22, रा. करंजे) यांना दोन दुचाकीवर असणाऱ्या तिघांनी मारहाण केली. मारहाण करणाऱ्यांनी सहा यांच्याकडील अडीच हजारांची रोकड, मोबाईल हिसकावून घेत पळ काढला. याची तक्रार सहा यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंदवली.

पीक नुकसानीच्या पाहणीसाठी गृहराज्यमंत्री थेट बांधावर!  

दोन दिवसांत लुटमारीच्या दोन घटना घडल्यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक बाजीराव ढेकळे, उपनिरीक्षक नानासाहेब कदम, अनिल पाटील, हवालदार प्रशांत शेवाळे, अविनाश चव्हाण, शिवाजी भिसे, जोतिराम पवार, गणेश भोग, अक्षय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ, किशोर तारळकर यांनी तपास सुरू केला. या पथकाने माहितीच्या आधारे अक्षय पवार, दीपक चव्हाण, दत्तात्रय शिंदे यांना अटक केली. अटकेतील तिघांनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

Edited By : Siddharth Latkar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Arrested Three Youths Satara News