
कऱ्हाड (जि. सातारा) : मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या आटके येथील युवकाच्या मृत्यूप्रकरणी तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणातील संशयित युवकाच्या वडिलांनाही ताब्यात घेतले आहे. त्याची सखोल चौकशी सुरू आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी दिली. प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित सचिनसह त्याच्या वडिलांना अटक करावी, यासाठी आटके ग्रामस्थांनी तालुका पोलिसात साेमवारी सकाळी ठिय्या मांडला होता. त्यामुळे पोलिसांनी त्या प्रकरणात मृताच्या नातेवाइकांचे जबाब नोंदवून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. संशयिताचे घर पेटवून देण्याचा अज्ञातांनी प्रयत्न केला. त्यात घराबाहेरील शेड जळून खाक झाले. त्या प्रकाराने गावात तणाव निर्माण झाला होता. गावात पोलिस बंदोबस्तही वाढवला आहे. त्यातही पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पोलिस निरीक्षक भरणे म्हणाले, की आटके येथील अजय विठ्ठल दुपटे (वय 30) याला गुरुवारी मारहाण झाली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच दिवशी अजयचा भाऊ नागेश याने तालुका पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार मारहाणप्रकरणी सचिन लक्ष्मण दुपटे (रा. आटके) याच्यावर संशय व्यक्त झाल्याने पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली होती. मात्र, मारहाण झालेल्या युवकाच्या रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. मात्र, या प्रकरणात संशयित सचिन दुपटे याच्या वडिलांनाही अटक करा, यासाठी मृत अजयच्या नातेवाइकांसह आटके येथील ग्रामस्थांनी पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला होता. त्यानुसार त्यांच्याशी चर्चा करून खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, अद्यापही त्यात सचिन दुपटेच संशयित आहे. यात अजय व त्यांच्या नातेवाइकांचे जबाब घेण्यात आले आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही करत आहोत.
रेठरेत 23.54 लाखांचा अपहार; विकास सेवा सोसायटीच्या खत विभागप्रमुखावर गुन्हा दाखल
मृताच्या नातेवाइकांनी सचिनच्या वडिलांवर संशय व्यक्त केला आहे. सध्या तरी सचिनला अटक आहे. मात्र, त्याच्या वडिलांना सखोल चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संशयित सचिन दुपटेच्या वडिलांवरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, यासाठी मृताच्या नातेवाइकांसह ग्रामस्थांनी तालुका पोलिसात दुपारपर्यंत ठिय्या मांडला होता. त्यात पोलिसांनी फिर्यादीनुसार गुन्हा दाखल आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली, तरीही संशयितासह त्याच्या वडिलांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. त्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणात संशयिताच्या वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले. या वेळी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, फौजदार अशोक भापकर यांनी अजयच्या नातेवाइकांसह ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. मृताच्या नातेवाइकांचे जबाब नोंदवले. संशयिताच्या वडिलांना ताब्यात घेतले. त्याची माहिती ग्रामस्थांना दिल्यानंतर तणाव निवळला. याप्रकरणी यापूर्वी मारहाणीचा गुन्हा दाखल होता. तो आता खुनाचा गुन्ह्यात वर्ग झाला आहे. फौजदार अशोक भापकर तपास करत आहेत.
शेतकऱ्यांनाे! वीजबिलातील 50 टक्के सवलतीचा लाभ घ्या; महावितरणचे आवाहन
या प्रकरणातील संशयिताचे आटके येथील घराला आग लावण्याचा प्रयत्न झाला. अज्ञात जमावाने लावलेल्या आगीत घरामागील जनावरांचा गोठा जळून खाक झाला आहे. त्यात शेळीसह दोन जनावरांचा मृत्यू झाला आहे, असे पोलिसांनी सांगितले. गावासह संशयिताच्या घराभोवती पोलिस बंदोबस्त लावला आहे. दुपारनंतर अचानक घराच्या मागून धूर येऊ लागल्याने पोलिसांनी मागे जाऊन पाहिले असता आग लागल्याचे दिसले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत गोठा जळून दोन जनावरे मृत्युमुखी पडली होती. नेमकी आग कोणी लावली याबाबत आताच काहीही सांगता येत नाही, चौकशी सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक भरणे यांनी सांगितले.
"तू सासरी जा, आपण सर्व प्रकरण मिटवू,' असे अजयने तिला सांगितले होते, त्यानंतर काय घडले वाचा सविस्तर
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.