esakal | 'काेणत्याही क्षणी लाकडाउनचा निर्णय झाल्यास परिस्थिती हाताळण्यास आम्ही सज्ज आहाेत'

बोलून बातमी शोधा

'काेणत्याही क्षणी लाकडाउनचा निर्णय झाल्यास परिस्थिती हाताळण्यास आम्ही सज्ज आहाेत'

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता रेमडेसिव्हिर औषधांचा अधिकचा पुरवठा जिल्ह्यासाठी व्हावा, यासाठी शासनाला पत्र द्यावे अशा सूचना राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनास केल्या आहेत.

'काेणत्याही क्षणी लाकडाउनचा निर्णय झाल्यास परिस्थिती हाताळण्यास आम्ही सज्ज आहाेत'
sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून, कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही. यासाठी जिल्ह्यातील ऑक्‍सिजन बेडची व व्हेंटिलेटरची संख्या वाढवा. शासनाने आणखीन कडक निर्बंध जाहीर केले, तर त्यांच्या अंमलबजावणीसाठी गृह विभागाने मनुष्यबळ तयार ठेवावे, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या आहेत.
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाचा आढावा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री देसाई यांनी घेतला. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते.
 
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता रेमडेसिव्हिर औषधांचा अधिकचा पुरवठा जिल्ह्यासाठी व्हावा, यासाठी शासनाला पत्र द्या, अशा सूचना करून राज्यमंत्री देसाई म्हणाले, ""सध्या जिल्ह्यात तीन हजार ऑक्‍सिजन बेड व 200 व्हेंटिलेटर आहेत. भविष्याचा विचार करून ऑक्‍सिजन बेड व व्हेंटिलेटरची संख्या वाढवली पाहिजे. शासनाने लॉकडाउन किंवा कडक निर्बंध जाहीर केले, तर त्यांच्या अंमलबजावणीसाठी गृह विभागाने मनुष्यबळ तयार ठेवावे, तसेच नागरिकांनी मास्कचा, वेळोवेळी सॅनिटायझरचा, सुरक्षित अंतर याचे पालन केले पाहिजे. याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.'' 

कऱ्हाडात फॅन्सी नंबर प्लेटसह धूम स्टाइल सुसाट; पोलिसांची तब्बल 27 हजार युवकांवर कारवाई 

गुढीपाडव्याचा सण साध्या पद्धतीने साजरा करा; जिल्हाधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन

धक्कादायक! साताऱ्यात कोरोना कहर सुरुच; हजारी पार करत जिल्ह्यानं गाठला नवा उच्चांक

जिवलग मित्रासाठी एकवटले मैत्रीचे जग; Whatsappच्या माध्यमातून गोळा केला तब्बल अडीच लाखांचा निधी

Edited By : Siddharth Latkar