भवानवाडीत जुगार अड्ड्यावर छापा; 19 जुगारी अटकेत

संतोष चव्हाण 
Sunday, 22 November 2020

जुगार अड्डा भवानवाडीतील खरजुलीआई डोंगराच्या पायथ्याशी सुरू होता. माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. कारवाईत वाहने, मोबाईल व रोख रक्कम रुपये 53 हजार 80 रुपये यासह एकूण 3 लाख 25 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

उंब्रज  (जि. सातारा) : भवानवाडी (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत डोंगर पायथ्याशी जुगार अड्ड्यावर काल सायंकाळी कऱ्हाड व उंब्रज पोलिसांनी छापा टाकून 53 हजार 80 रुपये रोख रकमेसह मोबाईल, वाहन, जुगार साहित्य यासह सुमारे 3 लाख 25 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत 19 जणांना ताब्यात घेतले. 

दत्ता सुदाम सोनावले (वय 38, रा. सासपडे, ता. जि. सातारा), निसार गुलाब आत्तार (42, रा. वडूज ता. खटाव), सुभाष शंकर पवार (54, रा. आटपाडी, ता. आटपाडी), विकास महादेव जाधव (44, रा. तांबवे, ता. कऱ्हाड), नाना किसन चव्हाण (51, रा. शिवडे, ता. कऱ्हाड), दिलीप बाबूराव वाडकर (63, रा. करंजे पेठ, सातारा), दादासाहेब विश्वनाथ जाधव (47, रा. आर्वी, ता. कोरेगाव), अमर तुकाराम तांबे (43, रा. उंब्रज), गणेश सुभाष शिंदे (38, रा. चिंचणी अंबक ता. कडेगाव), सुनील वामन भिसे (49, रा. सातारा), संजय श्रीरंग पडवळ (49, सातारा), सागर प्रकाश जाधव (24, उंब्रज ता. कऱ्हाड), अनिकेत रमेश बाबर (18, रा. उंब्रज), भारत सदाशिव घाडगे (55, रा. उंब्रज), सैफअली सत्तार शेख (26, रा. शनिवार पेठ, सातारा), तन्वीर इक्‍बाल शेख (29, रा. सातारा), आकाश चंद्रकांत देशमाने (18, रा. काशीळ, ता. जि. सातारा), अर्षद नईम शेख (26, रा. रायगाव ता. जावळी), वीरजकुमार दिनेश पंडित (24, रा. झारखंड) अशी जुगारप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. 

साताऱ्यात जुगार अड्ड्यावर छापा; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

हा अड्डा भवानवाडीतील खरजुलीआई डोंगराच्या पायथ्याशी सुरू होता. माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. कारवाईत वाहने, मोबाईल व रोख रक्कम रुपये 53 हजार 80 रुपये यासह एकूण 3 लाख 25 हजार 280 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कारवाईत पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड, पोलिस उपनिरीक्षक मोहन तलबार, पोलिस हवालदार सागर बर्गे, पोलिस नाईक प्रवीण पवार, सचिन देशमुख, नीलेश पवार, वैभव यादव, दत्तात्रय लवटे, महेश घुटुगडे यांनी कारवाई केली. अधिक तपास पोलिस हवालदार अभयसिंह भोसले करीत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Have Arrested 19 People In Umbraj Satara News