Video : पोलिसांच्या नव्हे तर स्वत:च्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरा

उमेश बांबरे
Tuesday, 15 September 2020

आता यापुढे विना मास्क हिंडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासन व पोलिसांना सहकार्य करून घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आवाहन सातारा पाेलिसांनी केले आहे.
 

सातारा : कोरोनाच संसर्ग टाळण्यासाठी शासनाने नागरिकांना मास्क घालणे सक्तीचे केले आहे, तरीही काही जण विनामास्क हिंडत असल्याने सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी सातारा शहरात विनामास्क हिंडणाऱ्यांवर धडक कारवाईची मोहिम राबविली. यामध्ये शाहूपुरी व सातारा शहर पोलिसांनी एकूण 40 जणांकडून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
 
शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात काही नागरिक टाळाटाळ करत आहेत. यामध्ये विनामास्क हिंडणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा नागरिकांना शिस्त लावण्यासाठी सहायक पोलिस अधीक्षक शेख यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी सातारा शहरात विनामास्क हिंडणाऱ्या नागरिकांवर धडक कारवाईची मोहीम राबविली. यामध्ये दुचाकीवरून विनामास्क हिंडण्यावर दंडात्मक कारवाई केली. सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी शहरातील विविध चार ठिकाणी ही कारवाई केली.

रोटरीतर्फे पोलिस ठाण्यांसह चौक्‍यांचे निर्जंतुकीकरण

यामध्ये दिवसभरात 40 नागरिकांकडून 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. 
या वेळी समीर शेख म्हणाले, ""नागरिकांनी आपल्या स्वत:च्या सुरक्षिततेसाठी मास्कचा वापर करणे आवश्‍यक आहे. कोरोना विरोधातील लढाई यशस्वी करण्यासाठी शासनाने केलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करणे आवश्‍यक आहे. आता यापुढे विना मास्क हिंडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासन व पोलिसांना सहकार्य करून घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा.''

साताऱ्यात 1300 ऑक्‍सिजन बेडची आवश्यकता; उपचाराविना जातोय 20 रुग्णांचा जीव 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Insists Citizen To Waer Mask Satara News