निराश, नाउमेद न होता अनिताचे प्रयत्न सुरूच राहिले. त्यातून यंदा पोलिस भरतीत ती यशस्वी ठरली. पोलिस दलात दाखल होणारी दुर्गम भागातील ती पहिली महिला.
नागठाणे : काट्याकुट्यांनी भरलेल्या वाटा तुडविणाऱ्या, रोज म्हशीमागे जाणाऱ्या, मातृछत्र हरपलेल्या अन् अक्षरगंध नसलेल्या वडिलांच्या जिद्दी लेकीने पोलिस भरतीचे (Police Recruitment) स्वप्न अखेर कवेत घेतले. दारिद्र्याने वेढलेल्या, दुर्गम खेड्यात राहिलेल्या अनिता लक्ष्मण ढेबे हिची ही प्रेरणादायी कहाणी.