
सातारा : हनी ट्रॅपमध्ये अडकवून एकाचे अपहरण, मारहाण करून पंधरा लाख रुपयांची मागणी करत तीन लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी एका महिलेसह पाच जणांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला करंजे येथील आहे. याबाबत मतकर कॉलनी झोपडपट्टीतील एका सेंट्रिंग व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. १० फेब्रुवारीला ही घटना घडली. दरम्यान, या घटनेने साताऱ्यात खळबळ उडाली आहे.