विजयाचा जल्लाेष पडला महागात; भाऊंना चढावी लागली पाेलिस ठाण्याची पायरी

विजयाचा जल्लाेष पडला महागात; भाऊंना चढावी लागली पाेलिस ठाण्याची पायरी

सातारा : काेराेनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात आपत्तकालीन आदेश यापुर्वीच लागू केला. काेराेनाची दाहकता लक्षात घेता ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर संबंधित गावांमध्ये विजयी मिरवणूक, रॅली काढणे, फटाके फोडणे, गुलाल उधळणे, विनापरवानगी फ्लेक्‍स, बॅनर लावण्यास मनाई आदेश काढण्यात आला हाेता. याबराेबरच मंगळवार (ता. 19) पहाटे सहा वाजेपर्यंत निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या परिसरातील सर्व हॉटेल, ढाबे, खानावळी, चायनीज, पानटपरी आदी व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेशही दिले हाेते. दरम्यान या नियमांचे उल्लंघन झाल्याने विविध ठिकाणी गुन्हे नाेंद झाले आहेत. 

माण, कराड, जावळी, खंडाळा आणि वाई तालुक्यात विविध पॅनेलच्या कार्यकर्त्यांवर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आजी-माजी पदाधिका-यांवर नियमाचा भंग केल्याने गुन्हे दाखल झाले आहेत. खंडाळा तालुक्यातील मिरजेवाडी येथे जमाव जमवून रॅली काढल्याने तसेच विजयाची घाेषणा देत गुलालाची उधळण केल्याने शिरवळ पाेलिसांनी 25 ते 30 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी काेणालाही अटक केलेली नाही. 

म्हसवड पालिकेच्या उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल

जावळी तालुक्यातील पिंपळी येथील सुमारे 15 जणांवर गुलालाची उधळण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माण तालुक्यातील कुकुडवाड येथील शिवाजीनगरमध्ये एकास दमदाटी करण्याचा प्रकार घडला आहे. दमदाटी करणारा हा ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाला हाेता. म्हस्वड पाेलिस ठाण्यात तक्रार प्राप्त झाल्यानंतर विजयी उमेदवारावर गुन्हा दाखल झाला आहे. 

पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात युवती ठार; मुंढेत शाेककळा

कालवडेत मारामारी प्रकरणी 18 जणांवर गुन्हा

कऱ्हाड तालुक्यात निवडणूक निकालानंतर कालवडे येथील दोन गटांत राडा झाला. दोन्ही गटांतील वादाचे पर्यवसन मारामारीत झाले. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून, 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली.
 
कालवडे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निवडणूक निकालानंतर दोन गटांत वाद झाला. वाद वाढत गेल्यावर त्यांच्यात मारामारी झाली. या प्रकरणी अभिजित प्रताप थोरात (वय 30, रा. कालवडे) यांनी दिलेल्या फिर्यादीत काल दुपारी ते गाडीतून गावातून निघाले होते. तेव्हा विरोधी पॅनेलच्या पराभूत उमेदवाराने जमाव केला. जगन्नाथ थोरात यांनी रस्त्यावरील दगड अभिजित थोरात यांना मारला. यात ते जखमी झाले तर प्रताप थोरात याने काठीने मारहाण केली. इतरांनी अभिजित व त्याच्या मित्रास लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जगन्नाथ प्रल्हाद थोरात, प्रताप आकाराम थोरात, प्रसाद प्रताप थोरात, विनायक शिवाजी थोरात, सुहास संभाजी थोरात, सुदाम रघुनाथ थोरात, सुजय संजय थोरात, प्रतीक प्रताप थोरात, संभाजी विलास थोरात (सर्व रा. कालवडे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया अंतर 29 दिवसांत पुर्ण करणा-या सुफियाची आज अजिंक्यता-याला गवसणी

जगन्नाथ प्रल्हाद थोरात (वय 50) यांनी दिलेल्या फिर्यादीत गावात उभे असताना विजयी उमेदवाराने जमाव करून मनोहर थोरात, अभिजित थोरात, अमोल थोरात यांच्यासह इतरांनी जगन्नाथ थोरात यांना मारहाण केली. सुहास थोरात, राजेंद्र थोरात यांनाही मारहाण केली. मनोहर थोरात यांनी त्याच्या ताब्यातील चारचाकी गाडी गर्दी असताना बेदरकार चालवली, असे फिर्यादीत म्हटले आहे. त्याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मनोहर मारुती थोरात, अभिजित प्रताप थोरात, अमोल प्रताप थोरात, मनोहर भगवान थोरात, प्रकाश आत्माराम थोरात, हरीष शिवाजी थोरात, शुभम धनाजी थोरात, विजय मारुती थोरात, जयदीप रामदास टोमके (सर्व रा. कालवडे, ता. कऱ्हाड) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या मारामारीमुळे कालवडेत तणाव असून, पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे तपास करत आहेत. 

ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच मारलं मैदान; साता-यात सर्वपक्षीयांचा दावा

पंचायत समितीच्या माजी सदस्यासह चौघांवर गुन्हा 

कुडाळ (जि. सातारा) : माथाडी कामगारांचे नेते वसंत पवार व जावळी पंचायत समितीचे माजी सदस्य शंकर पवार यांच्यासह चार जणांवर सरताळे (ता. जावळी) येथे ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
 
यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरताळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांमध्ये भीमराव गणपती भिसे हे निवडणुकीत पराभूत झाले. यानंतर गावातील काही जणांनी भीमराव भिसे यांना जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करत धमकी दिली व तुझ्यामुळे आमच्या गावचे 25 लाख रुपयांचे बक्षीस बुडाले. आम्ही तुझे घर जाळून तुझा काटा काढू, असे म्हणत शिवीगाळ दमदाटी केल्याची तक्रार फिर्यादी भीमराव भिसे यांनी मेढा पोलिस ठाण्यामध्ये दिली.

आमदार मकरंद पाटलांच्या चर्चेनंतर महाबळेश्वर पालिकेत रंगले राजकारण

त्यानुसार संशयित लक्ष्मण आनंदराव पवार, वसंत यशवंत पवार, शंकर लक्ष्मण पवार, विशाल सर्जेराव जाधव (सर्व रा. सरताळे) असे चार जणांच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्‍यांमध्ये पहिलाच अशा स्वरूपाचा गंभीर गुन्हा दाखल झाला असल्याने सरताळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनास्थळावर पोलिस बंदोबस्त होता. यासंदर्भात पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जाणवे अधिक तपास करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com