esakal | मलकापुरात पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी; विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त

बोलून बातमी शोधा

Police
मलकापुरात पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी; विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने जप्त
sakal_logo
By
राजेंद्र ननावरेे

मलकापूर (सातारा) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लागू केलेले निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. ढेबेवाडी फाटा परिसरात पोलिसांनीही कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

'ब्रेक द चेन'अंतर्गत पोलिस व पालिकेच्या संयुक्त पथकाने शहरात गर्दीची चाहूल लागताच शहरात फिरून कारवाईची धडक मोहीम राबवली. शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी वाहनांची तपासणी सुरू केली आहे. शहरात येणाऱ्यांसाठी कडक उपाययोजना करत येथील ढेबेवाडी फाट्यावर पोलिसांनी चेक पोस्ट केले आहे. तेथे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहनेही जप्त केली जात आहेत.

जनतेनं स्वत:च्या कुटुंबाप्रमाणं पोलिसांचीही काळजी घ्यावी; गृहराज्यमंत्र्यांची आर्त साद

Edited By : Balkrishna Madhale