भोगावच्या सहायक पोलिस निरीक्षकास साताऱ्यात पडली लाखाेंची भुरळ अन्...

भोगावच्या सहायक पोलिस निरीक्षकास साताऱ्यात पडली लाखाेंची भुरळ अन्...

सातारा : दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी तक्रारदाराकडे 25 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक धोंडीराम शिवाजी वाळवेकर (वय 37, सध्या रा. गुरुदेव रेसिडेन्सी, तामजाईनगर, सातारा, मूळ रा. बाजार भोगाव, ता. पन्हाळा) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

संबंधित तक्रारदारावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये त्याला मदत करण्यासाठी वाळवेकरने तक्रारदाराकडे 25 लाखांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्याअनुषंगाने "लाचलुचपत'च्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यानंतर सापळा लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, चाहूल लागल्याने वाळवेकरने ही लाच स्वीकारली नाही. मात्र, पडताळणीमध्ये त्याने लाचेची मागणी करताना निष्पन्न झाला होता.

वनवासमाचीनंतर आता या गावात वाढतेय मोठी चिंता...

Video : बापरे! पाेत्यात मृतदेह, करंजे परिसरात बघ्यांची गर्दी

प्रेमीयुगुलांना लुटणारे अखेर सापडलेच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com