esakal | दुर्गम भागात पोलिस वसाहती उभारणार : शंभूराज देसाई
sakal

बोलून बातमी शोधा

SATARA

दुर्गम भागात पोलिस वसाहती उभारणार : शंभूराज देसाई

sakal_logo
By
- उमेश बांबरे

सातारा : दुर्गम भागात पोलिस वसाहतींसाठी त्याचबरोबर पोलिस ठाण्याच्या उभारणीबाबतचेही प्रस्ताव त्वरित सादर करावेत, असे निर्देश आज गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिस प्रशासनास दिले. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, पोलिस उपअधीक्षक उपस्थित होते.

श्री. देसाई म्हणले, ‘‘दुर्गम भागांतील पोलिसांसाठी कामकाजाच्या ठिकाणी नजीक राहण्यासाठी घर असणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलिस विभागाने अशा दुर्गम भागातील पोलिस कर्मचाऱ्यांसाठी वसाहत बांधण्यासाठी प्राधान्याने प्रस्ताव तयार करून सादर करावा. त्याचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. त्याचबरोबर पोलिस ठाण्याच्या उभारणीबाबतचाही प्रस्ताव सादर करावा. येत्या पाच ऑक्टोबरपासून शाळा व महाविद्यालये सुरू होत आहेत. त्यादृष्टीने विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महिला पथदर्शी प्रकल्पामधून बंदोबस्त ठेवावा.’’

शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शहरी, तसेच ग्रामीण शाळेतील विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षणासाठी प्रत्येक तालुक्यासाठी किमान १० तज्ज्ञ प्रशिक्षकांची नेमणूक करून त्यांना प्रशिक्षण द्यावे, तसेच समाजकल्याण विभागाने आश्रमशाळेतील मुलींनाही स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या

loading image
go to top