esakal | भाजपच्या राजेंविरोधात राष्ट्रवादी मैदानात; शरद पवारांकडून 'या' दिग्गजाला 'ग्रीन सिग्नल' I Political
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Pawar

पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात दीपक पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली.

भाजपच्या राजेंविरोधात राष्ट्रवादी मैदानात

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : सातारा पालिकेच्या निवडणुकीत (Satara Municipal Election) राष्ट्रवादीच्या (NCP) स्थापनेपासून पक्षाचे पॅनेल टाकले गेले नव्हते. साताऱ्याच्या दोन्ही राजांच्या विरोधात शिवसेना (ShivSena) व काँग्रेसला (Congress) सोबत घेऊन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार (NCP leader Deepak Pawar) यांनी खासदार शरद पवार (MP Sharad Pawar) यांच्याकडे केली. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असा शब्द श्री. पवारांनी दिल्याचे दीपक पवार यांनी सांगितले.

सातारा पालिकेच्या निवडणुकीसंदर्भात दीपक पवार यांनी काल पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी सातारा पालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पॅनेल टाकण्याबाबत चर्चा झाली असून, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेसला सोबत घेऊन पालिकेची निवडणूक लढण्याची इच्छा दीपक पवार यांनी व्यक्त केली. सातारा पालिकेतील नेमकी राजकीय स्थिती सांगताना दीपक पवार म्हणाले, ‘‘राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सातारा पालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राजांच्या विरोधात पक्षाने पॅनेल टाकले नव्हते. पक्षाच्या चिन्हावर आजपर्यंत कधीच निवडणूक झालेली नाही. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पालिका निवडणुकीत पॅनेल टाकावे, अशी लोकभावना आहे. लोकांची मागणी असल्याने सध्या अनेक इच्छुक उमेदवार पक्षाशी संपर्क करून स्वतंत्र पॅनेल टाकावे, अशी मागणी करत आहेत.

हेही वाचा: 'त्यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी निवडणुकीला सामोरं जावं'

Sharad Pawar

Sharad Pawar

सातारा शहरातील अनेक इच्छुक उमेदवार राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत; पण महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व काँग्रेसला सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही राजांच्या विरोधात पॅनेल टाकू शकते. त्यासाठी पक्षाने मला परवानगी द्यावी, अशी मागणी दीपक पवार यांनी शरद पवार यांच्यापुढे केली. त्यावर शरद पवार यांनी सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री तथा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी मी स्वत: बसून चर्चा करेन. यामध्ये सातारा पालिकेत पॅनेल टाकण्याबाबतचा अंतिम निर्णय घेऊ, असे सांगितले. सर्व बाबी सकारात्मक असल्याने निर्णय घेण्यास हरकत नाही; पण पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे श्री. पवार यांनी सांगितले. त्यामुळे सातारा पालिकेत दोन्ही राजांच्या विकास आघाडींच्या विरोधात राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन पॅनेल पडण्याची शक्यता बळावली आहे.

loading image
go to top