माण-खटावात 'नवचैतन्य'; जनता दलाच्या कमानेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश

सत्यवान कमाने यांना पूर्ण ताकद देणार : नाना पटोले
Satyawan Kamane
Satyawan Kamaneesakal

निमसोड (सातारा) : जनता क्रांती दल (Janata Kranti Dal) या सामाजिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सत्यवान कमाने (Satyawan Kamane) यांनी मंगळवारी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यासह माण-खटाव तालुक्यात काँग्रेसला नवचैतन्य प्राप्त होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State President Nana Patole) यांनी सत्यवान कमाने यांना पूर्ण ताकद देणार असून त्यांच्या आजपर्यंतच्या सामाजिक कामाची काँग्रेस पक्ष (Congress party) लवकरच दखल घेईल.

Summary

गेली वीस वर्षे सामाजिक प्रश्नांसाठी मी संपूर्ण महाराष्ट्रात व विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात काम केले आहे.

मुंबईत झालेल्या प्रवेशाच्या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan), आमदार भाई जगताप (MLA Bhai Jagtap), चंद्रकांत हंडोरे, मोहन जोशी, खटाव-माणचे काँग्रेस नेते रणजितसिंह देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अशोकआबा गोडसे, डॉ. महेश गुरव, मानाजी घाडगे,अनिल लोंढे, आनंदा साठे, चंद्रकांत अवघडे, सचिन पवार, महादेव सकट, रमेश सकट, विकास सकट यांची प्रमुख उपस्थिती होती.

Satyawan Kamane
सनसनीखेज आरोप करण्यापलिकडं चित्रा वाघांना काही येतं?

सत्यवान कमाने म्हणाले, काँग्रेसची विचारधारा ही गोरगरीब कष्टकऱ्यांच्या हिताची आहे. गेली वीस वर्षे सामाजिक प्रश्नांसाठी मी संपूर्ण महाराष्ट्रात व विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात काम केले आहे. सामाजिक कार्याला सत्तेची जोड असल्याशिवाय गोरगरीब समाजबांधवांचा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकास होणार नाही. त्यासाठी काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणानुसार पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार आहे. रणजितसिंह देशमुख म्हणाले, सत्यवान कमाने यांच्या प्रवेशामुळे माण-खटाव विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद निर्माण झाली आहे. सर्वांना बरोबर घेऊन दोन्ही तालुक्यात काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी आम्ही एकत्र मोठ्या ताकतीने काम करू. यावेळी माण-खटावसह सातारा जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com