esakal | सावधान! आनेवाडी-रायगाव सेवारस्त्यावर भगदाड; सहा महिन्यांत दुसऱ्यांदा प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

Anewadi-Raigaon

सावधान! आनेवाडी-रायगाव सेवारस्त्यावर भगदाड; सहा महिन्यांत दुसऱ्यांदा प्रकार

sakal_logo
By
प्रशांत गुजर

सायगाव (सातारा) : पुणे-बंगळूर महामार्गावर असणाऱ्या आनेवाडी-रायगाव सेवारस्त्यावर (Anewadi-Raigaon Service Road) पाटबंधारे वसाहतीनजीक पुन्हा भगदाड पडल्याने रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. महामार्गावर सहापदरीकरण करताना मुख्य रस्त्याबरोबर सेवारस्त्यांचेही काम करताना दर्जाकडे दुर्लक्ष झाले. लिंब खिंड ते वेळे या मार्गावर अनेक ठिकाणी सेवारस्ते खचले आहेत. (Poor Condition Of Anewadi-Raigaon Service Road Satara News)

त्यातच गेल्या वर्षी उडतरेनजीक महालक्ष्मी हॉटेलसमोर तब्बल 100 मीटर रस्त्याचा भराव 20 फूट खाली खचला होता. वर्षभर तो रस्ता तसाच खचून पडला होता. अगदी तशीच परिस्थिती आता आनेवाडीत आहे. त्याकडेही संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. साताऱ्याकडून मुख्य रस्त्यावरून येताना आनेवाडी गावात आत सेवारस्त्यावर येताना मार्गावरच सहा महिन्यांत दुसऱ्यांदा मोठे भगदाड पडले. या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ चालू असते.

काेराेनाचा विस्फाेट : बाप रे! केंद्राच्या यादीत महाराष्ट्रातील दाेन जिल्ह्यांचा समावेश

अवजड वाहनेही ये-जा करत असतात. या ठिकाणी रस्त्याखाली पूर्णपणे पोकळ भराव असल्याने रस्ता खचू लागल्याचे दिसत आहे. या ठिकाणी धोकादायक स्थितीबद्दलचा फलक लावण्यात न आल्याने वाहनचालकांची अचानक हे भगदाड पाहून भंबेरी उडत आहे. रस्ते विकास महामंडळाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील युवा कार्यकर्ते रमेश जगताप, भरत गोरे, घनश्‍याम करपे, संतोष पिसाळ यांनी हे भगदाड बुजवून बाजूला झाडाच्या फांद्या लावून तात्पुरती सोय केली आहे.

महामार्गावर सेवारस्त्यावर अनेक ठिकाणी धोकादायक परिस्थिती आहे. स्थानिकांना त्याचा खूप त्रास होत आहे. त्यामुळे अनेक अपघातही घडत आहेत. त्यावर संबंधित विभागाने लक्ष ठेऊन अशा अडचणी दूर कराव्यात.

-योगेश जेधे, सामाजिक कार्यकर्ते, सायगाव

Poor Condition Of Anewadi-Raigaon Service Road Satara News