
सातारा : शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे चार महिन्यांपासून रखडलेले मानधन मिळावे, या कर्मचाऱ्यांना दोन ड्रेस व ओळखपत्र मिळावे यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी आयटक शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.