
-सचिन शिंदे
कऱ्हाड : कऱ्हाड, पाटण तालुक्यातील ६५ हजार २७५ वीज कंपनीच्या ग्राहकांकडे ४८ कोटी ९९ लाख ४० हजारांची वीज बीले थकीत आहेत. त्याच्या वसुलीचे वीज कंपनीसमोर आव्हान आहे. ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यासहीत स्ट्रीट लाईची तब्बल ४१ कोटींची वीज बीले थकीत आहेत.
त्यात पाणी पुरवठ्याच्या ७७७ योजनांची सर्वाधिक २१ कोटी ५९ लाख तर विविध ग्रामपंचायतीच्य एक हजार ६४३ पथदिव्यांची १९ कोटी ३८ लाख ५३ हजारांची वीज बीले थकीत आहेत. मार्च अखेर याची वसुली न झाल्यास वीज कंपनी स्ट्रीट लाईट पुन्हा बंद करण्याच्या मार्गावर आहे. तर पाणी पुरवट्याच्याही काही योजना थकीत वीज बीलामुले अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.