
सकाळी दुकाने उघडल्यानंतर वीजपुरवठा तोडण्यात आल्याचे त्या व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आले.
सातारा : थकीत वीजबिल भरण्यास मुदत देण्याऐवजी भल्या सकाळी वीज जोडणी तोडल्याने संतप्त झालेल्या साताऱ्यातील व्यापाऱ्यांनी वीज वितरण विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. या व्यापाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत न केल्यास शटर बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
येथील व्यापाऱ्यांना थकीत वीजबिल भरणा करण्यासाठीच्या नोटिसा वीज वितरणकडून बजावण्यात आल्या होत्या. कोरोना, लॉकडाउन व इतर कारणांमुळे व्यवसाय चक्र थंडावल्याने पहिल्या टप्प्यात 30 टक्के बिले भरून घेत उर्वरित रकमेसाठी मुदत देण्याची मागणी काही व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली होती. निवेदन देऊन काही दिवस झाले असतानाच बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांनी शाही मशिद परिसरातील काही व्यापाऱ्यांचा वीजपुरवठा तोडला. सकाळी दुकाने उघडल्यानंतर वीजपुरवठा तोडण्यात आल्याचे त्या व्यापाऱ्यांच्या निदर्शनास आले.
यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत साताऱ्यातील व्यावसायिक सागर भोसले यांनी वीज वितरणने व्यापाऱ्यांची 30 टक्के बिले भरून घेत उर्वरित बिलांसाठी मुदत देण्याची, तसेच तोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. मागणीचा विचार करत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आगामी काळात संपूर्ण जिल्ह्यातील व्यापारी शटर बंद आंदोलन करतील, असा इशारा दिला.
Video पाहा : आता काेल्हापूर, सांगलीही गृहराज्यमंत्र्यांचे टार्गेट
हिंदुत्वाच्या प्रश्नावर भाजप आणि सेनेत हा फरक आहे
त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही ; निलेश राणेंची टीका
मी इथला डॉन आहे, तुला सोडत नाही; प्रतापसिंहनगरात तलवार हल्ला
Edited By : Siddharth Latkar