
'शरद पवारांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचं पाप करणाऱ्यांना योग्य तो धडा शिकविण्यात येईल.'
'शरद पवारांच्या घरावरील हल्ला म्हणजे, महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा हल्ला'
दहिवडी (सातारा) : खासदार शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या घरावरील हल्ला हा महाराष्ट्राच्या अस्मितेवरचा, संस्कृतीवरचा हल्ला आहे. सरकारनं या हल्ल्यामागील सूत्रधार शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख (NCP leader Prabhakar Deshmukh) यांनी केलीय. काल खासदार शरद पवार यांच्या घरावर एसटी महामंडळाच्या आंदोलनातील काही समाजकंटकांनी हल्ला केला. या हल्ल्याच्या निषेधार्थ प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दहिवडीत महाविकास आघाडीनं बाजार पटांगण ते तहसीलदार कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत निषेध मोर्चा काढला. या मोर्चाला संबोधित करताना ते बोलत होते.
हेही वाचा: या जन्मीचं कर्म याच जन्मात फेडावं लागतं; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला
यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सचिव प्रा. कविता म्हेत्रे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, नगराध्यक्ष सागर पोळ, सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष सुनिल पोळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, पंचायत समिती सदस्य तानाजी कट्टे व रमेश पाटोळे, नगरसेवक सुरेंद्र मोरे, महेश जाधव, विशाल पोळ, शामराव नाळे, सुभाष नरळे, युवराज सुर्यवंशी, के. डी. भोसले, किशोर सोनवणे, माण-खटाव युवक अध्यक्ष प्रशांत विरकर, अमोल काटकर, सतीश मडके, विष्णुपंत अवघडे, महेंद्र जाधव, अजित पवार, सूर्याजी जगदाळे, रमेश शिंदे, कुमार पोतेकर, अमोल पोळ, वर्षा मोरे, विकास निंबाळकर, नारायण अहिवळे मान्यवर उपस्थित होते.

NCP leader Prabhakar Deshmukh
हेही वाचा: CBI, ED ला घाबरुनच मायावतींनी निवडणूक लढवली नाही : राहुल गांधी
प्रभाकर देशमुख पुढे म्हणाले, आम्ही सर्वजण पवार साहेबांच्या पाठीशी ठाम असून पवार साहेबांसाठी कोणताही संघर्ष करण्यास तयार आहोत. डोकी भडकावून अतिशय घाणेरडं काम काल समाजकंटकांनी (ST Workers Strike Maharashtra) केलं. शरद पवार साहेबांच्या प्रतिमेला धक्का लावण्याचं पाप करणाऱ्यांना योग्य तो धडा शिकविण्यात येईल. शासनानं खोलात जावून या घटनेची शहानिशा करावी. एम. के. भोसले म्हणाले, गुलाल उधळल्यानंतर दुसर्या दिवशी करण्यात आलेला हल्ला म्हणजे अपयश लपविण्यासाठी केलेले षडयंत्र आहे. प्रा. कविता म्हेत्रे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीसाठी अतिशय लाजिरवाणी अशी कालची घटना आहे. ज्या कोणी ही घटना घडवून आणली त्यांना कठोर शासन व्हावं. किशोर सोनवणे म्हणाले, गोरगरीब, कष्टकरी, दिनदलित, सर्व जातीधर्मातील जनतेला सोबत घेवून जाणाऱ्या पवार साहेबांवरील हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असा त्यांनी संताप व्यक्त केला.
Web Title: Prabhakar Deshmukh Condemned The Attack On Sharad Pawar House
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..