बिजवडी : आपल्या लग्नासाठी तो एक महिन्याची सुटी घेऊन गावी आला होता. एक मे रोजी तो विवाहबंधनात अडकला. लग्नानंतरचे (Marriage) धार्मिक विधी सुरू असतानाच सैन्य दलातून तातडीने हजर राहण्याचा संदेश आला आणि हातावरील मेंदी आणि ओली हळद सोबत घेऊन पूजेच्या दुसऱ्याच दिवशी नववधू व कुटुंबाचा निरोप घेऊन काळेवाडी (ता. खटाव) येथील जवान (Indian Jawan) प्रसाद भरत काळे हा ऑपरेशन सिंदूरसाठी (Operation Sindoor) रवाना झाला.