प्रतापसिंह हायस्कूलच्या गुणवत्तावाढीचा रयत शिक्षण संस्थेने उचलला विडा; जिल्हा परिषदेत सामंजस्य करार

Satara
Satara
Updated on: 

सातारा (जि. सातारा) : येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा विडा रयत शिक्षण संस्थेचे उचलला असून, शैक्षणिक सहकार्याचा जिल्हा परिषदेबरोबर एका बैठकीत सामंजस्य करार झाला. 

जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत गुणवत्तावाढीसाठी प्रतापसिंह हायस्कूल चालवायला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने रयत शिक्षण संस्थेचे शैक्षणिक सहकार्य घेण्याबाबतची सहविचार सभा काल झाली. त्या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, शिक्षण, अर्थ व क्रीडा समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती सोनाली पोळ, समाजकल्याण समितीच्या सभापती कल्पना खाडे, माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, सदस्य दीपक पवार आदी अधिकारी, संस्थचे सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव संजय नागपुरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) प्रभावती कोळेकर उपस्थित होते. 

श्री. जगदाळे यांनी प्रास्ताविकात प्रतापसिंह हायस्कूलचे ऐतिहासिक महत्त्व विषद केले. जिल्हा परिषदेमार्फत प्रतापसिंह हायस्कूलला अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, याबाबत सविस्तर माहिती दिली. संजीवराजे यांनी शाळा सुधारणेविषयी जिल्हा परिषद व रयत शिक्षण संस्था यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. 

"रयत'चे कार्याध्यक्ष डॉ. पाटील म्हणाले, ""प्रतापसिंह हायस्कूलची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले आहे. या हायस्कूलची गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करू. त्यामध्ये प्रतापसिंह हायस्कूलमध्ये गुरुकुल प्रकल्प सुरू करणे, डिडिटल स्कूल, गणित-विज्ञान व भाषा प्रयोगशाळा सुरू करणे, शेतीशाळा, शिक्षकांना अद्ययावत करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देणे, तसेच सयाजीराव हायस्कूल व कल्याणी हायस्कूल या ठिकाणी जे उपक्रम राबविले जातात, ते सर्व उपक्रम "प्रतापसिंह'मध्ये राबविले जातील.'' येत्या पाच वर्षांत प्रतापसिंह हायस्कूल हे सातारा शहरात अग्रमानांकित शाळा म्हणून नावारूपाला येण्यासाठी रयत शिक्षण संस्था सर्वतोपरी प्रयत्न व अंमलबजावणी करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

अध्यक्ष कबुले यांनी प्रतापसिंह हायस्कूलला ऊर्जितावस्था आणण्यासाठी सूक्ष्म असे नियोजन करून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक उपक्रम सुरू करावेत. त्यासाठी आवश्‍यक ते शिक्षक प्रतिनियुक्तीवर घ्यावेत, रयत संस्थेमार्फत मार्गदर्शक समन्वयक नेमून त्यांच्याद्वारे शाळेच्या माध्यमातून जे समन्वयक नेमतील त्यांना सर्व प्रकारे शैक्षणिक सुधारणा अंमलबजावणी विषयक स्वातंत्र्य असेल.'' 

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत म्हणाले, ""दोन वर्षांपूर्वी 50 लाख रुपये शासनाकडून प्राप्त झाले आहेत. नवीन शालेय इमारत, मैदान इत्यादी सोईसुविधा उपलब्ध केल्या आहेत. जसे गाव दत्तक घेतले जाते, तशी प्रतापसिंह शाळा "रयत'ने दत्तक घ्यावी.'' प्रतापसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मती देशमाने यांनी सूत्रसंचालन केले. शिक्षणाधिकारी कोळेकर यांनी आभार मानले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

karad ganpati visarjan
Satara Shahupuri Police Bribe Case
Udayanraje Bhosale Supports Dolby Operators
Sugarcane Agitation
Marathi News Esakal
www.esakal.com