शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगड कारखान्याच्या संचालक मंडळाचा ठरलं

शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगड कारखान्याच्या संचालक मंडळाचा ठरलं
Updated on

कुडाळ (जि. सातारा) : सोनगाव (ता. जावळी) येथील प्रतापगड सहकारी साखर कारखाना व किसन वीर सहकारी साखर कारखान्याने सन 2012-13 पासून भागीदारी करार करून प्रतापगड कारखाना सहकारात टिकविण्याचे काम केले. शेतकरी सभासदांचा ऊस वेळेत जावा, कामगारांना 12 महिने काम मिळावे. वेळेवर पगार मिळावा या हेतूने हा करार केला होता; परंतु मागील पाच वर्षांत प्रतापगडचे तीन गळीत हंगाम किसन वीर व्यवस्थापनाने बंद ठेवले. यामुळे शेतकरी, कामगारांसह कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारखाना चालविण्यास देण्याचा मूळ हेतूच साध्य होत नसल्यामुळे हा करार मोडण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, त्याबाबत साखर आयुक्तांकडे लवाद दाखल केल्याची माहिती प्रतापगड कारखान्याचे संचालक व जावळीचे उपसभापती सौरभ शिंदे यांनी दिली. 

या वेळी प्रतापगड कारखान्याने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, सुरुवातीच्या काळामध्ये किसन वीर कारखान्याने प्रतापगड कारखाना क्षमतेने चालविण्याचा प्रयत्न केला; परंतु किसन वीर कारखान्याची आर्थिक परिस्थिती मागील काही वर्षांपासून खूपच ढासळलेली व अडचणीची झालेली आहे. त्यामुळे त्यांनी प्रतापगडचे तीन गळीत हंगाम बंद ठेवले. त्याचा दुष्परिणाम प्रतापगडच्या उस उत्पादकांसह कामगारांना भोगावा लागला. प्रतापगडच्या कामगारांना 15 महिन्यांपासून पगार दिला नाही, तसेच पगारावरील प्रायव्हेडंट फंडही 15 महिन्यांपासून भरलेला नाही. 

कर्मचाऱ्यांची पगार व तद्‌अनुषंगिक कोणतीही देणी दिलेली नाहीत. त्यामुळे किसन वीर व्यवस्थापनाने कराराची कोणतीही पूर्तता केली नसल्याचे स्पष्ट होत आहे, तसेच मागील गळीत हंगामाचे शेतकऱ्यांचे ऊस पेमेंट 12 महिने दिले नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारखान्याची प्रापर्टी अटॅच करण्याचे आदेशही साखर आयुक्त यांनी दिले. त्यामुळे प्रतापगडची अवस्था खूपच बिकट झाल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतापगड कारखान्याचे चेअरपर्सन व संचालक मंडळ यांनी साखर आयुक्त यांना भेटून करार मोडण्याबाबतचे निवेदन सादर केले आहे. कारखाना सहकारात ठेवण्यासाठी किसन वीर कारखान्याने मदत केली; परंतु किसन वीर कारखान्याची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने व सध्याची अवस्था बिकट झाल्यामुळे किसन वीर व्यवस्थापनाने सामंजस्याने हा करार संपुष्टात आणून प्रतापगड कारखाना हा प्रतापगड व्यवस्थापनाच्या ताब्यात देण्याचे आवाहनही या निवेदनाद्वारे केले आहे.  साखर आयुक्तांकडे लवादाच्या नोटिसा दाखल केलेल्या असून, लवकरच कायदेशीर पूर्तता करून आपला कारखाना आपल्या ताब्यात घेऊन प्रतापगड व्यवस्थापन योग्य व उत्तमरीतीने येणारा गळीत हंगाम स्वबळावर यशस्वीपणे चालवणार आहोत. त्यामुळे प्रतापगडच्या सभासदांचा व कामगारांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी ग्वाही कारखान्याचे संचालक सौरभ शिंदे यांनी दिली. या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र फरांदे, बाळासाहेब निकम, मालोजीराव शिंदे, प्रकाश भोसले, प्रदीप तरडे उपस्थित होते.

आता अधिकारी, कर्मचाऱ्यांची उदयनराजे करणार ओपन हार्ट सर्जरी?

Edited By : Siddharth Latkar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara City Bus Service Gets Green Signal 10 Mini Electric Buses Ordered After Sakal Campaign Know Proposed Routes
Doctor Dies During Treatment In Satara Amid Alleged Gun License Fitness Certificate Pressure Action Demanded
MBBS Success Story Sahil Jadhav From Valvan Village Achieves Doctor Dream Through Hard Work And Family Support
Satara District Bank Election 2026 Udayanraje Bhonsle Emerges Strong With 250 Resolutions And Key Political Influence
Marathi News Esakal
www.esakal.com