President of Warkari Sampraday Yuva Manch Maharashtra Akshay Maharaj Bhosale
President of Warkari Sampraday Yuva Manch Maharashtra Akshay Maharaj Bhosale

वारकऱ्यांच्या सेवा-सुविधांसाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष प्रयत्न करावेत

अक्षयमहाराज भोसले यांचे आवाहन

दहिवडी - अत्यंत संयमी व श्रद्धाळू व्यक्तिमत्व तसेच पांडुरंगावर विशेष श्रद्धा असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या सेवा व सुविधांसाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्राचे अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले यांनी केले आहे.

अक्षयमहाराज म्हणाले, वारीच्या वाटेवर वारकरी वर्गाच्या सोयीसाठी मुख्यमंत्र्यांनी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. अजून सुध्दा वारीमध्ये म्हणावी स्वछता, शौचालय, आरोग्य याबाबत समाधानकारक उपाययोजना दिसून येत नाही. जी सुविधा दिली आहे तिची स्वच्छता राखली जात नाही, असे अनेकदा दिसून आले आहे. पाण्याच्या अभावामुळे शौचालये अस्वछ असतात. अपुऱ्या सुविधांमुळे यंत्रणावर अधिकचा ताण पडत आहे. आमचा वारकरी देखील व्यवस्थेपेक्षा भक्तिरसात तल्लीन असतो. त्यामुळे त्याचे या दुरावस्थेकडे दुर्लक्ष असते. मात्र या हरिभक्तांची काळजी घेणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे.

अक्षयमहाराज पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी केलेली शासकीय महापूजाच प्रसार माध्यमे समाजाला दाखवतात. मात्र वारी कालावधीत या लाखो वारकऱ्यांची सेवा सरकारकडून घडली तर पांडुरंगाला देखील हर्ष वाटेल. सुदैवाने मुख्यमंत्र्यांना अध्यात्मिक पार्श्वभूमीचा वारसा आहे. आम्हाला खात्री आहे शिंदे सरकार लवकरच वारकरी हितार्थ मोठे पाऊल उचलून आपली संप्रदायाबद्दलची श्रद्धा समाजास दाखवून देईल.

अक्षयमहाराज भोसले हे संत साहित्य अभ्यासक असून वारकरी संप्रदायातील युवकांचे मोठे संघटन असणाऱ्या वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र याचे अध्यक्ष तसेच महाएनजीओ फेडरेशनचे कार्याध्यक्ष आहेत. सध्या वारीत महाएनजीओ फेडरेशन, आर्ट ऑफ लिविंग, वारकरी संप्रदाय युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शेखर मुंदडा यांच्या सहयोगाने वारकरी सेवा रथाच्या माध्यमातून अक्षयमहाराज लाखो वारकऱ्यांची स्वतः सेवा करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com