शेतकरी चिंताग्रस्त; बटाट्याच्या दरात घसरण सुरुच

ऋषिकेश पवार
Wednesday, 20 January 2021

यंदा, बटाटा शेती किफायतशीर करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी जादाचा खर्च करून सुधारित कुफरी चंद्रमुखी, कुफरी ज्योती, पुखराज व इतर जातींच्या बटाट्याची लागवड करण्यास प्राधान्य दिले होते. मात्र, उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

विसापूर (जि. सातारा) : बटाटा उत्पादकांना प्रतिक्विंटल 900 ते 1,200 रुपये दर मिळत असल्याने लागवडीचा खर्च नुकसानीत जात असून, खटाव तालुका उत्तर भागातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. नवीन बटाट्याची आवक होत नसल्याने बाजारात बटाट्याला 2,500 ते 2,800 रुपये असा उच्चांकी दर मिळत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नवीन बटाट्याची बाजारात आवक सुरू झाली. त्यामुळे बटाट्याचे दर टप्प्याटप्प्याने कमी होत गेले असून, अजूनही दरात घसरण सुरूच आहे. परिणामी बटाट्यास मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
 
मागील हंगामात झालेल्या मुसळधार पावसाने खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे आर्थिक नुकसान भरून काढण्याच्या हेतूने शेतकऱ्यांनी मुख्य नगदी पीक असलेल्या बटाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. मात्र, या हंगामातील सततच्या बदलत्या हवामानामुळे जोमात असलेली बटाट्याची पिके रोगास बळी पडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी जादाच्या औषध फवारण्या करून पीक निरोगी ठेवण्याचा प्रयत्न केला, तरीही उत्पन्नात घट झालेली दिसते. दर वर्षी होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत या वर्षी बियाणे व औषध फवारणीचा खर्च जास्त झाला आहे. त्यातच बटाट्याच्या दरात होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे पिकास लागलेले भांडवल निघेल का नाही, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे.

खटावात चिठ्ठीव्दारे उजळलं अनेकांचं नशीब; आई-मुलगा, पती-पत्नीचीही जोडी ठरली सर्वात भारी!

ग्रामस्थांना विश्वास; पोलिसांनी लक्ष घातले तर वाठारच्या पार्किंगचे ग्रहण सुटेल

यंदा, बटाटा शेती किफायतशीर करण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी जादाचा खर्च करून सुधारित कुफरी चंद्रमुखी, कुफरी ज्योती, पुखराज व इतर जातींच्या बटाट्याची लागवड करण्यास प्राधान्य दिले होते. मात्र, उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 

रब्बी हंगामातील बटाटा पीक 80 ते 90 दिवसांचे असून बियाणे, खते, औषधे, आंतरमशागत, मजुरीवर दर एकरी सरासरी 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो. 

- धनराज काटकर, बटाटा उत्पादक शेतकरी, काटकरवाडी

ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच मारलं मैदान; साता-यात सर्वपक्षीयांचा दावा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Price Decreased Of Potato In Khatav Satara Marathi News