
खंडाळा (जि. सातारा) : सध्या सर्व ऑनलाइन तंत्रज्ञानाद्वारे शिक्षक अध्यापन करत आहेत. याचबरोबर कोरोनासंदर्भात प्राथमिक शिक्षकांना अनेक कामे असतानाही दर आठवड्यास अध्ययन, अध्यापनाचा ऑनलाइन अहवाल सादर करण्याचा शासकीय आदेश जारी केले आहेत. त्यात प्राथमिक शिक्षक संघाचा (संभाजीराव थोरात गट) विरोध आहे. हा आदेश रद्द न केल्यास या प्रक्रियेवर बहिष्कार घालणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी दिली.
या संबंधीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना पाठवण्यात आले आहे. राज्यातील शिक्षक ऑनलाइन अध्यापनाबरोबरच कोरोना साह्यता कक्ष, "माझे कुटुंब, माझी जबाबदारी' अंतर्गत विविध सर्वेक्षण, विलगीकरण कक्षातही कार्यरत आहेत. हे करत असताना ऑनलाइन अध्ययन, अध्यापनाची साप्ताहिक माहिती लिंकवर भरण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. ही माहिती लिंकवर भरायला लावणे म्हणजे शिक्षक व शिक्षण प्रक्रियेतील अधिकाऱ्यांवर अविश्वास दाखवल्याची भावना निर्माण झाली आहे.
इराणमधील कैद भारतीय युवकांना राष्ट्रवादीच्या खासदारांनी साेडविले
सद्य:स्थितीत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून "शाळा बंद-शिक्षण सुरू' या उपक्रमांतर्गत राज्यातील शिक्षक प्राप्त परिस्थितीत ऑनलाइन अध्यापन करत आहेत. शिक्षकांनी स्वाध्याय पुस्तिका विकसित करून विद्यार्थ्यांपर्यंत पोच केल्या आहेत.
मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गाचे काम रखडले
शिक्षकांना कोविडच्या कामकाजातून कार्यमुक्त करण्यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाने आदेश काढून स्थानिक प्रशासनाला शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचीची सूचनाही दिली आहे. परंतु, शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.
अशा स्थितीत ऑनलाइन साप्ताहिक माहिती भरण्यासंदर्भातील परिपत्रकामुळे शिक्षकांत असंतोष निर्माण झाला असून हे परिपत्रक रद्द करावे. परिपत्रक रद्द न केल्यास शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक लिंक भरण्याच्या प्रक्रियेवर बहिष्कार घालणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र बॅंक केळघरातच राहु देना भाऊ!
शासनाच्या निर्णयावर जिल्हा शिक्षक संघही ठाम आहे. शासनाने नवीन परिपत्रक रद्द न केल्यास लिंक भरण्याच्या प्रक्रियेवर बहिष्कार घातला जाईल.
- चंद्रकांत यादव, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.