
कऱ्हाड : कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपद बदलण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. त्यासाठी विशेष बैठकही होणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्याशिवाय आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्याही नावाची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला असतानाच श्री. चव्हाण दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या बदलाला दुजोरा दिला आहे.