
कऱ्हाड : देशात किंबहुना राज्यात अस्थिर परिस्थिती आहे. राज्याला जीएसटीचा परतावा मिळाला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारली गेली. लाडकी बहीण योजनेचे हप्ते द्यायला पैसे नाहीत. अशी स्थिती असतानाच राज्यात जातीय दंगली घडवून अराजकता माजवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. हे सगळे केंद्र सरकारच्या आश्रयाने चालले आहे. या स्थितीला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केला.