Karad Municipal Body Activates PA System to Enhance Citizen Safety
Sakal
सातारा
Karad News: कऱ्हाडात होणार पब्लिक ॲड्रेस सिस्टिम कार्यान्वित; नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्याकडून आढावा, सुरक्षिततेसाठी ठरणार उपयुक्त!
PA system useful for disaster management in Karad: कऱ्हाडात पब्लिक ॲड्रेस सिस्टिम कार्यान्वित; वाहतूक कोंडी आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल
कऱ्हाड : शहरात सीसीटीव्हीसोबत कॅमेरे मोठ्या प्रमाणात बसविण्यात आले आहेत. त्या यंत्रणेला पब्लिक ॲड्रेस सिस्टिमची जोड देण्यासाठी पालिकेने फेरसर्व्हे सुरू केला आहे. पब्लिक ॲड्रेस सिस्टिम म्हणजेच, पीए यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी त्याचा आढावा घेतला. नव्या कारभाऱ्यांकडून त्या यंत्रणेला चालना मिळण्याचे संकेत आहेत. वाहतूक कोंडी, सुरक्षिततेसह स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने ती यंत्रणा शहरात कार्यान्वित करण्याचा मानस आहे.

