लाचप्रकरणी सार्वजनिक 'बांधकाम'च्या कर्मचाऱ्याला अटक

लाचप्रकरणी सार्वजनिक 'बांधकाम'च्या कर्मचाऱ्याला अटक

सातारा : रस्त्याच्या कडील झाडांची तोड नियमापेक्षा जास्त केल्याने वखार व्यावसायिकाकडून 15 हजारांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रहिमतपूर शाखेतील कर्मचाऱ्याला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. बाळू बाबूराव वाघ (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
 
महाबळेश्वर- विटा या रस्ता विस्तारीकरण कामात अडथळा ठरणारी झाडे तोडण्याचा ठेका एका वखार व्यावसायिकाला देण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित झाडे तोडताना त्याच्याकडून जास्त झाडांची तोड झाली होती. त्यावर कारवाई न करण्यासाठी वाघने वखार व्यावसायिकाकडे 25 हजार मागितले.

पुणे- सातारा रस्ता जेसीबीने उखडणार; उदयनराजेंचा इशारा

त्यानंतर वखार व्यावसायिकाने सातारा लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली. यानुसार रहिमतपूर येथे सोमवारी सायंकाळी सापळा रचत बाळू वाघला तडजोडीअंती 15 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. याबाबत रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम साेमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com