Pune Bengaluru Highway Incident: युवकाला तीन किलोमीटर फरफटत नेले; लिंब खिंडीजवळ वाहतूक ठप्प; महामार्गावर भरधाव कारचालकाचा थरार

Dramatic Incident on Pune-Bengaluru Highway Near Anewadi: पुणे-बंगळूर महामार्गावर आनेवाडी ते लिंब खिंडदरम्यान कारचालकाने एका युवकाला सीटबेल्टच्या साहाय्याने सुमारे तीन किलोमीटर फरफटत नेल्याचा प्रकार घडला.
Pune Bengaluru Highway Incident

Pune Bengaluru Highway Incident

esakal

Updated on

आनेवाडी: पुणे-बंगळूर महामार्गावर आनेवाडी ते लिंब खिंडदरम्यान काल थरारक घटना घडली. एका कारला धक्का देऊन पुढे निघालेल्या जीप कारला आनेवाडी टोलनाक्यावर अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला कारचालकाने सीटबेल्टच्या साहाय्याने तब्बल तीन किलोमीटर लिंब खिंडीपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या जमावाने कारची तोडफोड करत चालकासह दोघांना चांगलाच चोप दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com