
आरोपींकडून पोलिसांनी दहा लाख रुपयांचे 200 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपींनी अधिक गुन्हे केले असावेत म्हणून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
सातारा : पुणे शहर पोलिसांच्या विमानतळ पोलिस स्टेशनच्या शोध पथकाच्या (Detection Branch) पथकांने 250 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी केल्याच्या आरोपाखाली उच्चभ्रु सोसायटीच्या एका माजी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. चोरीस गेलेले दागिने विकत घेणा-या साता-यातील सराफासही पोलिसांनी अटक केल्याची माहिती ई-सकाळला दिली.
लोहगाव येथील न्याती एविटा येथे राहणारा सौरभ कुंदन आपल्या कुटूंबासह 30 डिसेंबर 2020 मध्ये कात्रज येथे वडिलांना भेटायला गेला होता. दुसर्या दिवशी संध्याकाळी ते परत आले. कपाटातून दागिने चोरी केल्याचे समजल्यानंतर त्याने सात जानेवारीस विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे संतोष उर्फ लारा काशिनाथ जाधव (वय 35) जे लोहगावातील त्या सोसायटीच्या माजी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यतर हाेते त्यांची चाैकशी केली. संबंधितास पाेलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आपला साथीदार संतोष उर्फ रॉकी अरुण धनवाजीर (वय 34, राहणार, निंबाळकर नगर, लोहगाव) याच्या साथीने कुंदन यांच्या घरात घुसला आणि चाेरी केल्याचे सांगितले. त्यांनी चोरीची दागिने साता-यातील शनिवार पेठेतील अशोक गणेशलाल जानी (54) या सराफास विकल्याचीही कबुली दिली. त्यानूसार जानी यास अटक केल्याचे विमानतळ पोलिस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी सांगितले.
James Naismith Google Doodle आजच्या दिवशी बास्केटबॉलचा लागला हाेता शाेध, जाणून घ्या त्यामागची कथा
आरोपींकडून पोलिसांनी दहा लाख रुपयांचे 200 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. आरोपींनी अधिक गुन्हे केले असावेत म्हणून पोलिस अधिक तपास करीत आहेत. ही कारवाई डीसीपी (झोन)) पंकज देशमुख, एसीपी (येरवडा विभाग) किशोर जाधव आणि निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलिस निरीक्षक (गुन्हे) मंगेश जगताप, पीएसआय हनुमंत गिरी आणि पोलिस कर्मचारी अविश शेवाळे, अशोक आटोले, उमेश धेंडे, रमेश लोहकरे, विशाल गाडे, संजय अधारी, विनोद महाजन, सचिन भिंगारदिवे, नाना कार्चे, हारून पठाण, राहुल मोरे, किरण अब्दागीरे, वैभव खरे आणि प्रशांत कापुरे हे हाेते.
मुंबई, पुणे, काेल्हापूरहून साता-याला येताय! त्यापुर्वी हे वाचा