
पुसेगाव : येथील श्री सेवागिरी महाराजांचा ७७ वा रथोत्सव सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, आमदार महेश शिंदे, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, मठाधिपती सुंदरगिरी महाराज आणि मान्यवरांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता श्री सेवागिरी महाराजांच्या रथाचे पूजन करण्यात आले. रथमार्गावरून तब्बल बारा तास श्री सेवागिरी महाराजांच्या रथाची मिरवणूक चालली.