esakal | महसूल मंडलात होणार विलगीकरण कक्ष; पाटणात सुपर स्प्रेडरांना रोखण्यासाठी 14 ठिकाणी व्यवस्था
sakal

बोलून बातमी शोधा

Quarantine Centre

कोरोना पॉझिटिव्ह असल्याने होम क्‍वारंटाइन केलेले लोक नियम न पाळता बाहेर पडत आहेत. त्यामुळे ते सुपर स्प्रेडर ठरत आहेत.

महसूल मंडलात होणार विलगीकरण कक्ष

sakal_logo
By
जालिंदर सत्रे

पाटण (सातारा) : कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याने होम क्‍वारंटाइन (Home Quarantine) केलेले लोक नियम न पाळता बाहेर पडत आहेत. त्यामुळे ते सुपर स्प्रेडर (Super Spreader) ठरत आहेत. त्यांना पायबंद घालण्यासाठी पाटण तालुक्‍यात आता 14 महसुली मंडलांमध्ये (Revenue Division) विलगीकरण कक्ष (Quarantine Centre) सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांना आता विलगीकरण कक्षात 14 दिवस काढावे लागणार आहेत. (Quarantine Centre Will Be In 14 Revenue Divisions Of Patan Taluka)

कोरोना महामारीने (Coronavirus) दोन महिने जनता मेटाकुटीस आली आहे. प्रशासनाकडून अनेक उपाय, बंधने घातली गेली. कडक लॉकडाउन (Lockdown), मोटारसायकली जप्त, सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्कचा वापर न करणारे अशांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तरीही कोरोनाची साखळी तुटता तुटत नाही. प्रशासन दक्ष, तर जनता सुस्त, अशी अवस्था आहे. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मागील वर्षी पॉझिटिव्ह रुग्णाला विलगीकरण कक्षात 14 दिवस ठेवले जात होते. त्यामुळे पहिल्या लाटेची साखळी लवकर तुटली. दुसऱ्या लाटेत हायरिस्क रुग्णांना कोरोना केअर सेंटरला उपचार, तर पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाइन करण्यात आले.

मात्र, होम क्वारंटाइनमधील रुग्ण कोणतेही नियम पाळत नाहीत. त्यामुळे ते बिनधास्त वावरत असल्याने ते सुपर स्प्रेडर ठरत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने (Government Maharashtra) राज्यातील रेड झोन असलेल्या जिल्ह्यांत गृह विलगीकरणाची सूट मागे घेत शासकीय विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पाटण प्रशासनाने मंडलनिहाय विलगीकरण कक्ष सुरू करून त्यांना त्यात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 14 पथके तयार करण्यात आली आहेत. रुग्णांना 14 दिवस घरी सोडले जाणार नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा: 'कोरोनाचा गळा आवळून त्याला एकदाचं मारून टाकावं'; शिक्षिकेने सांगितली थरारक कहाणी

पाटण तालुक्‍यात 14 विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. नियम न पाळणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना या विलगीकरण कक्षात 14 दिवस ठेवण्यात येईल.

-योगेश्वर टोंपे, तहसीलदार, पाटण

Quarantine Centre Will Be In 14 Revenue Divisions Of Patan Taluka

loading image