
चेंबरीच्या निकृष्टतेचा ठपका कोयनेसाठी लाजीरवाणा
कोयनानगर - गुणवत्ता व दर्जाबाबत देशात नाव असलेले कोयना धरण व प्रकल्पात कोणतेही काम असो, त्यात गुणवत्ता करण्याची परंपरा आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी मोडीत काढली आहे. कोयना प्रकल्पाचे विश्रामगृहाच्या उद्घाटनावेळीच त्याचे काम निकृष्ट असल्याचा ठपका उदघाटक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठेवला. त्यामुळे उद्घाटनाच्या कार्यक्रमातच गुणवत्ता व दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रकरणात कोयना प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार लटकणार, हे निश्चित.
कोयना धरण व प्रकल्पाने १६ मे रोजी एकसष्ठीत पदार्पण केले. त्याचे औचित्य साधून कोयना प्रकल्पाने नव्याने बांधलेल्या चेंबरी या विश्रामगृहाचे उद्घाटन व कोयना धरणग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करण्याचा कार्यक्रम घेतला. कोयना चेंबरीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात चेंबरीची पाहणी केल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले. उद्घाटन केल्यावर मी कशाचे उद्घाटन केले, हेच समजले नाही. हे उद्घाटनानंतर २५ मिनिटांत बोलून कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कोयना चेंबरीच्या कामासाठी शासनाने २ कोटी ४० लाख खर्च केला. प्रत्यक्षात या चेंबरीवर झालेला खर्च मोठा असला तरी चेंबरीचे काम उत्कृष्ट झाले नाही. नवीन इमारतीऐवजी केवळ इमारतीला डागडुजी, रंगरंगोटी केल्याचा संशय त्यांनी व्यक्त करून मोठ्या रकमेचे काम आर्किटेक्चरशिवाय झाल्याचे आश्चर्य व्यक्त करून प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. विजेचे अनावश्यक पॉइंट, छोट्या आकाराची स्नानगृहे, दर्जाहिन फरशा, ग्रॅनाईट, आजूबाजूला कृत्रिम फुलांची सजावट या सर्व कामाबाबत त्यांनी ताशेरे ओढून नाराजी व्यक्त केली. या प्रकरणी त्यांनी कोयना प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांनाही जबाबदार धरून त्यांची कानउघाडणी केली.
पाण्यासारखी पैशांची उधळपट्टी...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोयना धरणावर भेट अथवा पाहणी दौरा नसतानाही धरणाची रंगरंगोटी करून वारेमाप खर्च केला आहे. त्यामुळे अशा उधळपट्टीचा विचार करता कोयना प्रकल्पाच्या सर्व कामाचे राज्य शासनाने ऑडिट केल्यास पाण्याच्या पैशाची उधळपट्टी लक्षात येणार आहे.
Web Title: Question Present On Koyna Dam Work Status By Ajit Pawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..