
फलटण : फलटण तालुक्याच्या हक्काचे एक थेंबही पाणी इतरत्र कोणत्याही तालुक्याला देण्यात येणार नाही, असे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी स्पष्ट केले. पुणे येथे नीरा उजवा कालवा सल्लागार समितीची उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली.