
सातारा : खटावची मातीची भांडी, फलटणची लाकडी खेळण्यांसह सेंद्रिय गूळ, माणची उबदार घोंगडी, वाईची हळद अशा विविध वस्तू आणि पदार्थांनी भरलेली जिल्हा परिषदेच्या मैदानावरील मानिनी मिनी सरस जत्रा नागरिकांच्या गर्दीने फुलली जात आहे. या जत्रेत सातारकर हजेरी लावून बचतगटाच्या महिलांना दाद देत आहेत.