
रहिमतपूर पंचक्रोशीतील गावांचा विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. स्वच्छ भारत अभियानात अग्रभागी असणा-या पालिकेचा गावच्या माध्यमातून विकास साधणार आहे. विरोधी पक्षांनाही सोबत घेऊन पालिका क्षेत्रातील गावांचा विकास साधला जाणार असल्याचे नगराध्यक्ष आनंदा कोरे म्हणाले यांनी सांगितले.
रहिमतपूर (जि. सातारा) : येथील पालिकेच्या माध्यमातून रहिमतपूर शहरात आठवडा बाजारासाठी येणाऱ्या महिला व व्यापाऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी दोन मोबाईल टॉयलेट, शहराच्या विकासासाठी व स्वच्छतेसाठी एक जेसीबी व ट्रॅक्टर अशा एकूण 55 लाख रुपये खर्चाच्या साधनसामग्रींचे लोकार्पण करण्यात आले.
रहिमतपूर हे पंचक्रोशीतील मोठे शहर असून, आठवडी बाजार, शाळा, कॉलेज यासाठी येणाऱ्यांचे प्रमाणही जास्त आहे. या लोकांची, तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी होणाऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी दोन मोबाईल टॉयलेट व शहरातील विविध विकासकामांसाठी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कार्य करताना येणाऱ्या अडचणी दूर करून वेग प्रदान करण्यासाठी जेसीबी व ट्रॅक्टरचे खरेदी करण्यात आली. पालिकेच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान 14 व्या वित्त आयोगातून एक जेसीबी 28 लाख 30 हजार रुपयांचा घेण्यात आला.
शेतकरी संघटनांची कार्यपद्धती देशी दारू दुकानांसारखी; रघुनाथदादांची शेट्टी, खाेतांवर टीका
तर दोन मोबाईल टॉयलेट 20 लाख रुपये, घनकचरा प्रकल्प अहवालामधून एक ट्रॅक्टर सहा लाख 70 हजार रुपये अशा एकूण 55 लाख रुपयांच्या सामग्रीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून लोकार्पण करण्यात आले. नगराध्यक्ष आनंदा कोरे म्हणाले, रहिमतपूर पंचक्रोशीतील गावांचा विकास करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. स्वच्छ भारत अभियानात अग्रभागी असणा-या पालिकाचा गावच्या माध्यमातून विकास साधणार आहे. विरोधी पक्षांनाही सोबत घेऊन पालिका क्षेत्रातील गावांचा विकास साधला जाणार असल्याचे कोरे यांनी सांगितले. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, उपाध्यक्षा माधुरी भोसले, माजी उपाध्यक्षा चांदगणी आतार, शिवराज माने, शशिकांत भोसले, रमेश माने, ज्योत्स्ना माने, सुजाता राऊत, सुरेखा पाटील, नगरसेवक अनिल गायकवाड, सुनीता पवार, नगरसेवक, सर्व नगरसेविका, प्रा. भानुदास भोसले, आयुब मुल्ला, साहेबराव माने, बाळासाहेब बर्गे, नागरिक उपस्थित होते.
संपादन : बाळकृष्ण मधाळे