
कोपर्डे हवेली : येथील हद्दीत पहाटे पाचच्या दरम्यान रेल्वे गेट क्रमांक ९७ मधून अजमेर एक्स्प्रेसला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची धडक झाल्याचा संदेश गेटमनकडून कऱ्हाड रेल्वे स्थानकाला प्राप्त होताच रेल्वे अधिकाऱ्यांसह रेल्वे पोलिस व संबंधित यंत्रणेची तारांबळ उडाली. त्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, रेल्वे प्रशासनाने यंत्रणेच्या सतर्कतेच्या चाचणी घेण्याचे केलेले हे नियोजन असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा श्र्वास घेतला.