पावसामुळे बाजारपेठ लाॅक; सातारासह महाबळेश्वर, पाचगणीत दमदार पाऊस

पावसामुळे बाजारपेठ लाॅक; सातारासह महाबळेश्वर, पाचगणीत दमदार पाऊस
Updated on

सातारा : गेल्या दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे सातारा जिल्ह्यात दमदार पुनरागमन झाले आहे. पावसाच्या दुसऱ्या टप्प्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर, पाचगणी याबराेबरच सातारा शहरास पावसाने झाेडपले आहे. दरम्यान पावसामुळे बाजारपेठ ठप्प झालेली आहे.
सज्जता... राज्यात येणार 116 अद्ययावत बोटी 

सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे. सातारा शहर व परिसराला पावसाने झोडपले आहे. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. महाबळेश्‍वर येथे 187 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. याबरोबरच पाचगणी येथे देखील दमदार पावसाची हजेरी आहे. लॉकडाउनमुळे सध्या येथील पावसाळी पर्यटनास अद्याप गती आलेली नाही. जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांमध्ये पाऊस पडत असून शेतकरी वर्ग सुखावला आहे. 

Red Alert Mumbai: मुंबईत NDRF च्या तुकड्या सज्ज, नागरिकांनी सतर्क राहा... 

दरम्यान काेयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सहा हजार 71 क्‍युसेक इतके झाली आहे. धरणात (साेमवारी) सायंकाळी सहा पर्यंत 52.58 टीएमसी पाणीसाठा झाला हाेता. यामुळे चिंतेत पडलेल्या शेतकरी राजाने सुटकेचा निःश्वास टाकला आहे. जून महिन्यापासून सुरू झालेल्या पावसाच्या पहिल्या टप्प्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर साेमवारी सायंकाळच्या आकडेवारीनूसार 1817 मिलिमीटर, नवजा 1996 मिलिमीटर, तर महाबळेश्वर 1916 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी दिवसभरात कोयनानगर 40/1817 मिलिमीटर, नवजा 61/1996 मिलिमीटर, तर महाबळेश्वर 20/1916 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Local Train Update:अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी जाणून घ्या रेल्वे संदर्भातले अपडेट्स

Mumbai Rain Updates: गरज असेल तरच बाहेर पडा!, मुंबईत रात्रभर तुफान पाऊस 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Youth Pratik Kalbhor Dies After 46 Days Following Serious Bengaluru Highway Accident During Medical Treatment
Satara Native Celebrates Ganesh Festival in Nigeria Lagos for 16 Years Keeping Marathi Culture and Ganpati Tradition Alive
Rain Deficit Damages Kharif Crops in Satara Man Khatav and Other Talukas Look to Crop Insurance for Compensation
Farmer Loss Assessment
Marathi News Esakal
www.esakal.com