esakal | 'मोरणा'चे दरवाजे अडीच फुटांवर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Morna Gureghar Dam

मोरगिरीत मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये ९४.१५ टक्के पाणीसाठा झाला असून, पाण्याची पातळी ६५९.५० मीटर झाली आहे.

'मोरणा'चे दरवाजे अडीच फुटांवर; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
अरुण गुरव

मोरगिरी (सातारा) : मोरणा गुरेघर धरण (Morna Gureghar Dam) परिसरात पावसाचा जोर वाढला असून, रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटांनी उचलण्यात आले आहेत. धरणाच्या दरवाजातून २०४० क्युसेक पाणी मोरणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मोरणा नदीकाठावरील (Morna River) गावांतील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती मोरणा गुरेघर धरण मध्यम प्रकल्पाचे (Morna Gureghar Dam Project) सहायक अभियंता सागर खरात आणि शाखा अभियंता खांडेकर यांनी दिली. (Rain Update Today Heavy Rain In Morna Gureghar Dam Area bam92)

मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये ९४.१५ टक्के पाणीसाठा झाला असून, पाण्याची पातळी ६५९.५० मीटर झाली आहे. धरणांमध्ये एकूण पाण्याचा साठा ३६.७८५ दशलक्षघन मीटर आहे. मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये १७९३ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटांनी उचलल्याने धरणातून २०४० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे मोरणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा: चेरापुंजीला मागे टाकत कोयना धरण क्षेत्रात 'रेकॉर्ड ब्रेक' पाऊस

धरणातून पाणी सोडल्याने परिसरातील गोकूळ तर्फ पाटण येथील गोकूळ परिसरातील गावांना जोडणारा पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे काहीर, आंबेघर, हुंबरणे, पांढरेपाणी, वरपेवाडी या पाच गावांतील लोकांचा मोरणा परिसराशी संपर्क तुटू शकतो. काल रात्री नऊ वाजल्यापासून ५०८.५८ क्युसेक पाणी मोरणा नदीपात्रात सोडण्यात येत होते. मात्र, पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने आज दोन वक्र दरवाजे अडीच फुटांनी उचलण्यात आले असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Rain Update Today Heavy Rain In Morna Gureghar Dam Area bam92

loading image