esakal | सावधान! साताऱ्यासह केळघरात रस्ते पाण्याखाली; कऱ्हाड-चिपळूण मार्गावरही पाणीच पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

 Heavy Rain In Kelghar Area

केळघर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे केळघरातील ओढ्याला पूर आला असून पाणी पातळीत वाढ झाली आहे.

सावधान! साताऱ्यासह केळघरात रस्ते पाण्याखाली

sakal_logo
By
संदीप गाडवे

केळघर (सातारा) : साताऱ्यासह केळघर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर (Heavy Rain In Satara) वाढल्यामुळे केळघरातील ओढ्याला पूर आला असून पाणी पातळीत वाढ झाली आहे. येथील ओढ्यावरच्या पुलाचे बांधकाम सध्या सुरू आहे, त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता बनवला आहे. परंतु, ओढ्याच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने व पर्यायी रस्त्याला लावलेल्या मोऱ्या अपुऱ्या असल्यामुळे पश्चिमेकडील शेती दुसऱ्यांदा पाण्याखाली गेली असून मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. (Rain Update Today Heavy Rain In Kelghar Area bam92)

शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर दिवसभरात केव्हाही पर्यायी रस्ता वाहून जाण्याची शक्यता असल्याने मेढा पोलिस व बांधकाम विभागाने या रस्त्यावरील वाहतूक आंबेघर-डांगरेघर- पुनवडी मार्गे नांदगणेवरुन महाबळेश्वर अशी वळवण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कृष्णात निकम यांनी घटनास्थळी भेट देवून कामगारांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. दरम्यान, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याचे उपअभियंता श्री. निकम यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: साताऱ्यात आज-उद्या मुसळधार; हवामान विभागाकडून 'Red Alert' जारी

Kelghar Area

Kelghar Area

दरम्यान, कऱ्हाड ते चिपळूण प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही कोयना विभागाने सूचना दिल्या असून कदमवाडी ते नेचलदरम्यान काही ठिकाणी पाणी रस्त्यावर आल्याने रस्त्यावरील पाणी कमी झाल्याशिवाय प्रवास करु नका, अशा सक्त सूचना विभागीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. कालपासून सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे.

Rain Update Today Heavy Rain In Kelghar Area bam92

loading image