मोर पिसावर साकारले राजर्षी शाहूंचे चित्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजर्षी शाहूंचे चित्र

मोर पिसावर साकारले राजर्षी शाहूंचे चित्र

ढेबेवाडी : डाकेवाडी काळगाव, ता.पाटण येथील चित्रकार डॉ. संदीप डाकवे यांनी चक्क मोर पिसावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे चित्र रेखाटून महाराजांना अनोखे अभिवादन केले आहे.उद्या (शुक्रवारी) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी आहे, या पार्श्वभूमीवर श्री. डाकवे यांनी मोर पिसावर राजर्षी शाहू महाराज यांचे चित्र रेखाटले आहे. या अनोख्या चित्राचे परिसरातून कौतुक होत आहे. संदीप डाकवे यांनी आतापर्यंत अनेकांची शब्दचित्रे रेखाटली आहेत. त्यांच्या विविध छंदाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’, वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकॉर्ड, ‘हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’यामध्ये झालेली आहे.

विविध पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झाला आहे. अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

मोर पिसावर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे चित्र रेखाटून महाराजांना अनोखे अभिवादन केल्याने परिसरातून त्यांच्या कलाकारीचे मोठे कौतुक होत आहे.

Web Title: Rajarshi Shahu Painted On A Peacock Feather

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top