खासदार उदयनराजे 'या' संघटनेत करणार मोठा बदल

Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal
Updated on
Summary

'नव्‍या दमाचे चेहरे असणारी प्रतिष्‍ठानची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्‍यात येईल.'

सातारा : राजे प्रतिष्‍ठान (Raje Pratishthan Sanghatana) ही सामाजिक संघटना गेल्या १२ ते १३ वर्षांपासून आमच्‍या नेत्तृत्‍वाखाली कार्यरत आहे. या संघटनेत नवीन तरुणांना संधी देण्यासाठी प्रतिष्‍ठानच्‍या कार्यकारिणीत संघटनात्‍मक बदल करण्‍यात येणार आहेत. बदल केलेली नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्‍यात येईल, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्‍यावतीने पत्रकाव्‍दारे देण्‍यात आली आहे.

पत्रकात म्‍हटलं आहे की, समाजाशी एकरुप होवून, अन्‍यायाविरुध्‍द लढणाऱ्या तरुणांचे संघटन म्‍हणून राजे प्रतिष्‍ठान संपूर्ण राज्‍यात ओळखले जाते. आमच्या नेत्तृत्‍वाखाली प्रतिष्‍ठानच्‍यावतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. नोंदणीकृत असणारे हे प्रतिष्‍ठान आमच्या अध्यक्षतेखाली समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहे. प्रतिष्‍ठानच्‍या या कामाचा नुकताच आढावा घेण्‍यात आला.

Udayanraje Bhosale
'शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं शल्य सर्वांनाच, पण..'

यादरम्‍यान विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या युवकांच्‍या भावना जाणून घेण्‍यात आल्‍या. त्‍यानंतर प्रतिष्ठानच्या कार्यकारणीवर समाज आणि सेवाकार्य करण्यासाठी नवीन चेह-यांना संधी देण्याचा ठरवत जुनी कार्यकारिणी बरखास्‍त करण्‍यात आली. आगामी काळात नवीन युवकांना संधी देत प्रतिष्ठानच्‍या कार्यकारणीत जरुर ते बदल लवकरच करण्यात येणार आहेत. नव्‍या दमाचे चेहरे असणारी प्रतिष्‍ठानची नवीन कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्‍यात येईल, असंही उदयनराजे यांनी पत्रकात नमूद केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Javali Mourns Brave Soldier Tushar Bhilare; Family Left Devastated
Decades-Old Rehabilitation Issue Nears Resolution for 29 Dhom Dam Villages in Satara
Satara Leads by Example as Farmers Produce 25,482 Quintals of Soybean Seeds
UNESCO Kas Plateau flower blooming season
Marathi News Esakal
www.esakal.com