छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन : राजमाता कल्पनाराजे भोसले

छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी जीर्णोद्धारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन : राजमाता कल्पनाराजे भोसले

सातारा : संगममाहुली येथील कृष्णा- वेण्णा नद्यांच्या संगमावरील छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या जीर्णोद्धारीत समाधीचे राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते आज (मंगळवार) लोकार्पण करण्यात आले. समाधी जीर्णोद्धारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन झाल्याची प्रतिक्रिया राजमाता कल्पनाराजेंनी दिली.
 
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न त्यांचे नातू छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांनी पूर्ण केले. स्वराज्यविस्तारक छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांचे सातारा येथील रंगमहालात 15 डिसेंबर 1749 रोजी निधन झाले होते. त्यांच्या पार्थिवावर संगममाहुली येथील राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले व त्याचठिकाणी समाधी उभारण्यात आली होती. या समाधीचा जीर्णोद्धार लोकसहभागातून करण्याचा संकल्प साताऱ्यातील इतिहासप्रेमींनी सोडला.

पुणे- सातारा रस्ता जेसीबीने उखडणार; उदयनराजेंचा इशारा 

यानुसार या कामास ऑक्‍टोबर 2018 मध्ये सुरुवात झाली. मूळ समाधीस धक्का न लावता, आहे त्याचठिकाणी ताशीव आणि घडीव दगडांच्या साहाय्याने सदर समाधीचे काम हाती घेण्यात आले. सदर समाधीच्या काम पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या 270 व्या पुण्यतिथीदिवशी तिचे लोकार्पण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार आज संगममाहुली येथे जीर्णोद्धारीत समाधी लोकार्पण सोहळा राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला.

मराठा ही निर्णायक जात; विश्वासघात झाल्यास जनताच तुम्हांला खाली खेचेल : उदयनराजे 

या वेळी अजय जाधवराव, धिरेंद्र (राजू) राजपुरोहित, अमर जाधवराव, शशिकांत पवार, अविनाश कोळपे, निरज झोरे, विलास माने, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, गीतांजली कदम, तसेच साताऱ्यातील इतिहासप्रेमी उपस्थित होते. सदर समाधीच्या जीर्णोद्धारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन झाले असून, यामुळे साताऱ्याच्या वैभवात भर पडल्याची प्रतिक्रिया याप्रसंगी राजमातांनी नोंदविली.

Edited By : Siddharth Latkar
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com